Christmas Special  : सर्वांना जरूर आवडेल ; घरच्या घरी बनवा 'रेड वेलवेट कपकेक्स'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

यावर्षी जर तुम्ही ही काही बनवणार असाल तर रेड वेलवेट कपकेक्स नक्की करून पाहा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत 'रेड वेलवेट कपकेक्स' सर्वांना जरूर आवडेल. 

पुणे : ख्रिसमस सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. या दिवशी अनेक प्रकारचे केक बनवले जातात. अनेक घरांमध्ये या दिवसांत वेगवेगळे केक्स तयार करण्याची परंपरा आहे. यावर्षी जर तुम्ही ही काही बनवणार असाल तर रेड वेलवेट कपकेक्स नक्की करून पाहा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत 'रेड वेलवेट कपकेक्स' सर्वांना जरूर आवडेल. 

हे ही वाचा : ख्रिसमस फेस्टविल घरी साजरा करताय? ट्राय करा सोप्या टिप्स

रेड वेलवेट कपकेक्सची मऊ आणि मलईयुक्त बेक पाहून बरेच लोक विचार करतात की हे केक बनविणे फार कठीण जाईल. म्हणूनच जेव्हा त्यांना रेड वेलवेट  कपकेक्स खाण्याची इच्छा असते तेव्हा ते बाजारातून खरेदी करतात. हे वाचल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटत असेल तर ते बाजारातून आणण्याऐवजी घरीच बनवा तुम्हाला नक्की जमेल.

हे ही वाचा : Christmas Special : ख्रिसमससाठी स्पेशल प्लम केक, घरच्या घरी तयार करून पाहाच

साहित्य 

- एक कप आटा 
- २०० ग्रॅम दूध 
- १०० ग्रॅम लोणी 
- एक टीस्पून बेकिंग पाउडर
- एक टीस्पून फूड कलर
- एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स 
- एक टीस्पून व्हिनेगर
- एक टीस्पून बेकिंग सोडा 
- दोन मोठे चमचे पिठी साखर 
- एक टीस्पून कोको पाउडर
- एक कप ताक 
- आवश्यकतेनुसार पाणी 

कृती -

एका बाऊलमध्ये २०० ग्रॅम आटवलेले दूध घ्या. यामध्ये १०० ग्रॅम लोणी मिक्स करा. यात दोन मोठे चमचे पिठी साखर आणि एक कप मैदा मिक्स करा. त्यानंतर एक चमचा कोको पावडर, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, एक चमचा व्हिनेगर घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आता यामध्ये एक कप बटर/ लोणी घाला आणि  ¾ चमचा रेड फूड कलर मिक्स करा. अशा प्रकारे आपले पिठ तयार होईल. आता या पिठाला कपकेकमध्ये भरून घ्या. कपकेकच्या साचामध्ये 3/4th पीठ भरावे. कारण बेक झाल्यानंतर बेक फुलतो. आता ओव्हनमध्ये कपकेक्स घाला. ओव्हनला 10 मिनिटे गरम करावे आणि नंतर १५-२० मिनिटांसाठी १८० डिग्री सेल्सियस वर कपकेक्स बेक करावे. या पद्धतीने कप केक्स तयार. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make homemade red velvet cupcakes for Christmas