
Bharli Vangi Recipe- चमचमीत भरलेली वांगी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत, खावून मन होईल तृप्त
Bharli Vangi Recipe- बाजारामध्ये काही भाज्या या वर्षाच्या काही खास दिवासांमध्ये मिळतात तर काही भाज्या या वर्षभर उपलब्ध असतात. यातीलच एक भाजी म्हणजे वांगी Eggplant. बाजारामध्ये वर्षभर आणि कायम अगदी मुबलक दरामध्ये वांगी उपलब्ध असतात. Marathi Recipe Bharli Wangi Stuffed Eggplant
महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये वांगीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. एवढचं नव्हे तर इतर अनेक भाज्यांमध्ये किंवा सांबार आणि आमटीमध्ये Curry वांग्याचा वापर केला जातो. अनेक घरात मोठ्या आवडीने खाल्ली जाणारी वांग्याची भाजी म्हणजे भरलेली वांगी Bharali Wangi.
चमचमीत भरलेली वांगी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन अनेकांच्या आवडीचं असतं. तेव्हा आज आम्ही तुम्हाला अशीच झटपट होणाऱी भरलेली वांगी कशी बनवावी याची रेसिपी सांगणार आहोत.
भरलेली वांगी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
४-५ वांगी, १ कांदा बारीक चिरलेला, अर्धा चमचा जीरं, अर्धा चमचा मोहरी, ७-८ कडीपत्त्याची पानं, हिंग, १ चमचा हळद, १ चमचा लाल मिरची पावडर, ७-८ लसणाच्या पाकळ्या, एक लहान आल्याचा तुकडा, कोथींबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी शेंगदाणे, किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी, धणे, पांढरे तीळ १ चमचा, , तेल, मीठ चवीनुसार,
कृती-
भरलेली वांगी बनवण्यासाठी सर्वप्रथम वागी स्वच्छ धुवून ध्यावी. त्यानंतर वांग्याचं देठ न काढता पुढील बाजुने वांग्याला चार काप करावे.
एका वाडग्यात पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून यात वांगी टाकून बाजूला ठेवावी.
आता भरलेली वांग्यांसाठी मसाला तयार करण्यासाठी गॅसवर एक तवा तापत ठेवून त्यात शेंगदाणे भाजून घ्यावे. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढावे.
त्यानंतर तव्यात एक चमता तेल टाकून त्यात आलं, लसूण परतून घ्यावं, त्यानंतर यात एक चमचा धणे टाकावे.
तसचं किसलेलं खोबरं टाकून चांगंल सोनेरी भाजून घ्यावं. यात पांढपे तीळ टाकून मिनिटभर भाजून सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढावं.
हे देखिल वाचा-
मिक्सरच्या भांड्यामध्येच हळद, लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून सर्व सामुग्री मिक्सरला बारीक वाटून घ्यावी.
आता तयार मसाला एका प्लेटमध्ये काढा.
हा मसाला चिरा दिलेल्या सर्व वांग्यांमध्ये नीट भरून घ्या.
आता पुन्हा एक कढई गॅसवर तापत ठेवा. कढईमध्ये २-३ चमचे तेल टाका
तेल गरम झाल्यावर त्यात थोडं जिरं आणि मोहरी टाका.जीरं मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्त्याची पानं आणि हिंग टाका.
यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला लाला होईपर्यंत परतून घ्या.
कांदा लाल झाल्यानंतर त्यात मसाला भरलेली सर्व वांगी आणि उरलेला सर्व मसाला टाकून वांगी तेलात चांगली भाजून घ्या.
२ मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ घ्या.
कढईमध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाका. त्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर वांगी शिजू द्या.
एक दोन वेळा झाकण उघडून वांगी नीट हलवा जेणेकरून ती सर्व बाजूंनी शिजतील.
वांगी शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
अशा प्रकारे चमचमीत भरलेली वांगी तयार होतील. ही भरलेली वांगी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपातीसोबत खावू शकता.