esakal | 'मदर्स डे' ला आईसाठी सरप्राईज प्लॅन; मग हा पदार्थ नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

'मदर्स डे' ला आईसाठी सरप्राईज प्लॅन; मग हा पदार्थ नक्की ट्राय करा
'मदर्स डे' ला आईसाठी सरप्राईज प्लॅन; मग हा पदार्थ नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मदर्स डे जवळ येत आहे. जर तुम्ही तुमच्या आईला या दिवशी सरप्राईज देण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी चॉकलेट केक हे एक उत्तम सरप्राईज बनू शकते. चॉकलेट केक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. यासाठी फक्त तुम्हाला दोनच इंग्रडियन्सची गरज असते. यासाठी तुमचा जास्तीचा वेळही खर्च होणार नाही. शिवाय मेहनतही करावी लागणार नाही. फक्त तीस मिनिटांमध्ये तयार होणारा चॉकलेट केक बनवण्यासाठी फक्त दहा मिनिटांत बनतो. चला तर मग ही रेसिपी पाहूया...

साहित्य -

  • 4 अंडी

  • 250 ग्रॅम स्वीट चॉकलेट

  • साखर पावडर

  • आईस्क्रीम किंवा फळे

कृती -

सुरुवातीला तुम्ही ओव्हन 325 डिग्रीपर्यंत हीट करून ठेवा. जर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये कमीत कमी 40 मिनिटांसाठी याला शिजवू शकता. अंडे फोडून या मध्ये असणारा व्हाईट आणि येलो भाग वेगवेगळा करून ठेवा. त्यानंतर यातील पांढरा भाग उत्तम प्रकारे फेटा. यानंतर याला डबल बॉयलरमध्ये ठेवून मायक्रोओव्हन मध्ये तीस सेकंदासाठी चॉकलेट वितळवून घ्या. या चॉकलेटमध्ये अंड्याचा पिवळा बलक घालून उत्तम प्रकारे फेटून घ्या. हे मिश्रण फेटून झाल्यानंतर त्यात व्हाईट मिश्रण घाला. आणि पुन्हा एकदा भेटून घ्या. आता बेकिंग ट्रे मध्ये बटर किंवा तूप लावून घ्या. या तयार मिश्रणाला बेक होण्यासाठी ठेवून द्या. यानंतर तुम्ही याला ड्रायफ्रूट्सचे काप किंवा कोणत्याही टॉपिंगच्या मदतीने सजवू शकता.