पोळी खाऊन कंटाळा आलाय? १० मिनिटांत तयार करा कुकुंबर पोळी

Nagpur Food news Make Cucumber Poli in 10 minutes
Nagpur Food news Make Cucumber Poli in 10 minutes

नागपूर : पोळी, भाकर हे भारतीय जेवणात असतेच. सकाळी व रात्री प्रत्येकाच्या घरी पोळी तयार होत असते. याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. ही पोळी तयार करण्यासाठी आपण कणीकचा वापर करतो. मात्र, तुम्ही कधी कुकुंबर पोळी खाल्ला आहे का? नसणं खाल्ली तर जाणून घेऊया ही पोळी तयार करण्याची पद्धत.

कुकुंबर पोळी काकडीपासून तयार केली जाते. ही पोळी आरोग्यासाठी चांगली असते. आपण वजन कमी करण्यासाठी धडपडत असाल तर याचे नक्की सेवन करा. या पोळीमुळे तुमचे पोटच भरणार नाही तर वजन देखील कमी होईल. याचा तुम्ही चटणी किंवा सांबाराबरोबर आनंद घेऊ शकता.

कुकुंबर पोळी रवा, नारळ आणि काकडीचा वापर करून फक्त दहा मिनिटात तयार करू शकता. ही पोळी तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुकंबर पोळी बनवण्याची सोपी पद्धत. याचा वापर तुम्ही ब्रेकफास्टसाठी करू शकता.

मुख्य सामग्री

दोन कप किसलेली काकडी, तीन ते चार कप किसलेले कच्चे नारळ, आवश्यकतेनुसार चिरलेली कोथिंबीर, तीन चिरलेली हिरवी मिरची, तीन चमचे सूर्यफूल तेल, गरजेनुसार मीठ व एक कप रवा.

तयार करण्याची पद्धत

एका भांड्यात किसलेले काकडी, नारळ, कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घाला. सर्व साहित्य चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आता या मिश्रणात रवा टाकून साहित्य चांगले मिसळवा. आता मिश्रणाची पोळी तयार करा. मध्यम गॅसवर तीन ते चार मिनिट पोळी शिजू द्या. पोळी तयार झाल्यानंतर चटणी किंवा सांबाराबरोबर खायला द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com