
गावात 40-45 वर्षांपूर्वी ही प्रथा तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्या कुटुंबात काही तरी अप्रिय घटना घडल्याचं माहिती गावकरी सांगतात.
कांद्याच्या किमतींमध्ये कायमच चढ-उतार होत असतो. कांद्याचा दर वाढला की, गृहिणींचं बजेट कोलमडलं, अशा हेडिंगच्या बातम्याही आपल्याला वाचायला मिळतात. कांदा हा भारतीय पाक शैलीचा महत्त्वाचा घटक असला तरी, कांद्याशिवाय स्वयंपाक करा, हा नियम असे तर? हा चेष्ठेचा विषय नाही तर, हे खरंय.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
बिहारमध्ये असं एक गाव आहे जिथं, कांद्याचा वापर कोणत्याही पदार्थात केला जात नाही. बिहारमधील जहानाबाद जिल्हात चिरी तालुक्यात हे गाव असून, तिथं तुम्हाला प्रत्येक घरातील स्वयंपाक कांद्याशिवाय झालेला पहायला मिळतो.
- पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)
मागणी नसल्याने आवकच नाही
चिरी तालुक्यात बिगहा गावातील नागरिक कांद्याच्या दर वाढीवरून कधीच चिंताग्रस्त नसतात. किंबहुना कांदा कितीही महागला, तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. गावात कोणीच कांदा खात नाही. 30-35 उंबऱ्यांचं हे गाव आहे. गावात प्रामुख्यानं यादवाचा प्रभाव आहे. आश्चर्य वाटेल पण गावात कांदा आणि लसूण मिळत नाही. तिथल्या बाजारात याची आवक केली जात नाही.
- तिखट तरीही न बाधणारं नॉनव्हेज खायचंय? चला ‘सावजी खमंग’ला!
काय आहे कारण?
या संदर्भात गावातील ज्येष्ठ नागरिक रामविलास यांनी सांगितले की, कांदा आणि लसूणच्या किमती वाढल्या म्हणून आम्ही ते खात नाही असे नाही, तर अनेक वर्षांपासून इथं कांदा लसून खाल्ला जात नाही. आमचे पूर्वजही इथं कांदा लसूण खात नव्हते. गावात ही परंपरा अजूनही कायम आहे. गावात ठाकूरबाडी मंदिर आहे. हे मंदिर कांदा लसूण न खाण्यामागचं कारण सांगितलं जातं. या मंदिरामुळं गावात कांदा-लसूण खाण्याला बंदी असल्याची माहिती सुबरती देवी यांनी दिलीय.
- फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा...
श्रद्धा की अंधश्रद्धा?
गावात कांदा-लसूण न खाण्याची परंपरा आहे. ती तोडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. गावात 40-45 वर्षांपूर्वी ही प्रथा तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्या कुटुंबात काही तरी अप्रिय घटना घडल्याचं माहिती गावकरी सांगतात. त्यानंतर मात्र, कोणीही ही प्रथा तोडण्याचा प्रयत्न केला नाही. याला अंधश्रद्धा म्हणा किंवा आणि काय? गावकऱ्यांचा त्याच्या प्रचंड विश्वास असून, ते त्यावर ठाम आहेत.