रताळी आणि ब्लॅक बीन टॅकोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nupur patil healthy recipe Sweet Potato and Black Bean Tacos

रताळी आणि ब्लॅक बीन टॅकोस

नूपुर पाटील

आपण आरोग्यासाठी लाभदायी रेसिपी पाहणार आहे. ती मुलांना नक्कीच आवडेल.

साहित्य

  • १ मोठे रताळे, सोलून त्याचे लहान तुकडे करावेत किंवा किसून घ्यावे.

  • १ कप स्वच्छ धुतलेले ब्लॅक बिन्स

  • १/२ चमचा जिरेपूड

  • १/२ चमचा तिखट

  • चवीनुसार मीठ आणि मिरपूड

  • १ चमचा ऑलिव्ह तेल

  • ४-६ कॉर्न टॉर्टिला (हे साहित्य पसरण्यासाठीचा पोळीसारखा बेस)

सजावटीसाठी ; किसलेले चीज, बारीक केलेले अव्होकाडो, साल्सा सॉस, चिरलेली कोथिंबीर

कृती

  • ओव्हन ४०० डिग्री फॅरेनाइटपर्यंत सेट करा.

  • एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑइल, जिरे, तिखट, मीठ आणि मिरपूड घालून बारीक केलेले रताळे टाका.

  • रताळे एका बेकिंग शीटवर पसरवा आणि ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे भाजून घ्या. ते मऊ आणि किंचित लालसर होऊ द्या.

  • एका वेगळ्या पॅनमध्ये, ब्लॅक बीन्स मध्यम आचेवर ३-५ मिनिटे गरम करा.

  • टॉर्टिलास पॅकवर दिलेल्या सूचनेनुसार गरम करून घ्या.

  • टॅको एकत्र करण्यासाठी, प्रत्येक टॉर्टिलावर रताळे आणि ब्लॅक बीन्स पसरवा. आवडीनुसार कोणतेही पर्यायी टॉपिंग त्यावर पसरवा.

  • लगेच सर्व्ह करा आणि आनंद घ्या! ही रेसिपी फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्त्वांनीयुक्त आहे. आपल्या पाल्यामध्ये त्याबाबतची आवड सहजतेने निर्माण करू शकता.

टॅग्स :recipefood culture