हेल्दी किचन : अंड्याचे सॅण्डविच

मुलांच्या वाढीसाठी अंडी खूप महत्त्वाची असतात. आपण आज अंड्याच्या सॅण्डविचची रेसिपी पाहू.
Egg Sandwich
Egg SandwichSakal
Summary

मुलांच्या वाढीसाठी अंडी खूप महत्त्वाची असतात. आपण आज अंड्याच्या सॅण्डविचची रेसिपी पाहू.

- नूपुर पाटील

मुलांच्या वाढीसाठी अंडी खूप महत्त्वाची असतात. आपण आज अंड्याच्या सॅण्डविचची रेसिपी पाहू.

साहित्य

संपूर्ण धान्याच्या (होल ग्रेन) ब्रेडच्या दोन स्लाइस, एक मोठे अंडे, एक लो-फॅट चेडर चीजची स्लाइस, अर्धे कापलेले ॲव्होकाडो, एक कापलेला छोटा टोमॅटो, चवीसाठी मीठ आणि मीरपूड

कृती

  • ब्रेडच्या स्लाइस हलके तपकिरी होईपर्यंत टोस्ट करून घ्या.

  • नॉनस्टिक तव्यावर, मध्यम आचेवर अंड्याचे ऑम्लेट करून त्यावर मीठ आणि मीरपूड घाला.

  • अंडे पूर्ण शिजल्यावर त्यावर चेडर चीजची स्लाइस ठेवा आणि त्याला ३० सेकंदांसाठी वितळू द्या.

  • टोस्ट केलेल्या ब्रेडवर अॅव्होकाडो व टोमॅटोच्या स्लाइसचे थर द्या.

  • अंडे आणि चीज अॅव्होकाडो आणि टोमॅटोच्या थराच्या वर ठेवा.

  • ब्रेडची दुसरी स्लाइस अंडे आणि चीजच्या थरावर ठेवा व तुमचे सॅण्डविच पूर्ण करा.

  • ताबडतोब खायला द्या आणि सॅण्डविचचा आनंद घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com