esakal | ब्रेड स्लाईडपासून फक्त 10 मिनिटांत बनवा मलई गुलाबजामुन
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेड स्लाईडपासून फक्त 10 मिनिटांत बनवा मलई गुलाबजामुन

ब्रेड स्लाईडपासून फक्त 10 मिनिटांत बनवा मलई गुलाबजामुन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तुम्ही कधी विचार केला आहात का की, मिठाईच्या दुकानांमध्ये फ्रेश आणि ताजी मिठाई कशी काय दिसत. कारण अशावेळी या पदार्थांपासून पुढे जाणे होत नाही. गुलाब जामुन ही भारतीय पद्धतीची एक प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. कोणत्याही महत्वाच्या क्षणी किंना समारंभात याचा समावेश असतो. त्यामुळे फक्त काही मिनिटांत ब्रेडच्या स्लाईडचा वापर करुन तुम्ही गुलाबजामुन बनवू शकता. कशी ती सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

कृती -

साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी आणि त्या प्रमाणात साखर घ्या. हे मिश्रण एकत्र करा त्यानंतर याला थोडा चिकटपणा येईपर्यंत हलवत राहा. यामध्ये इलायची पावडर, केशर घाला. यानंतर याचा पाक बनवून चिकटपणा येईपर्यंत हलवत रहा. यानंतर यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. पांढऱ्या ब्रेडचे काही स्लाईड घ्या. त्याचे साईटचे कडा कापून घ्या. या स्लाईटचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. गरम दुधामध्ये घालून याचे पीठ मळून घ्या. त्यानंतर या पिठामध्ये मलई घाला. पुन्हा एकदा मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल तयार करून त्याला गोलाकार द्या. तयार गुलाब जामुन तेलामध्ये तळून घ्या. मध्यम आचेवर तेलात फ्राय झाल्यानंतर पाकामध्ये घालून दहा मिनिटे तसेच ठेवा. गुलाबजामुन थंड होतील तेव्हा अर्ध्यातून कापा आणि या वरती मलई पसरवा. यावर पिस्ताचे तुकडे घालून गार्निशिंग करा. तुमचे गोड गुलाब जामून तयार आहेत.

loading image