काय आहे जॉर्जियन पिझ्झाची कहाणी?

प्रशांत ननावरे
Friday, 13 December 2019

जॉर्जियन लोकांचं ‘ह्रदय' (guli) या शब्दासोबत फार आपुलकीचं नातं आहे. अनेक जॉर्जियन शब्द या शब्दापासून तयार झालेले दिसतात. उदा. भरलेले (filling) म्हणजेच gulsarti. ‘ह्रदय' हे सर्व भावना, आनंद आणि प्रेमाचं केंद्रस्थान आहे आणि असंच ह्रदय अनेक (खरंतर प्रत्येक) पदार्थांना असतं - जिथे त्या पदार्थामधील प्रमुख घटक भरलेला असतो. खाण्याचे शौकीन असलेल्या जॉर्जियन लोकांमध्ये असे पदार्थ बनविण्याची कलात्मकता ठासून भरलेली दिसते. याच पंक्तीतील जगभरात नावाजलेला पदार्थ म्हणजे ‘खाचापुरी' किंवा ‘खाच्यापुरी'. हाच उच्चार एकदा 'hatch-a-pooree' असाही करून बघा.

जॉर्जियन लोकांचं ‘ह्रदय' (guli) या शब्दासोबत फार आपुलकीचं नातं आहे. अनेक जॉर्जियन शब्द या शब्दापासून तयार झालेले दिसतात. उदा. भरलेले (filling) म्हणजेच gulsarti. ‘ह्रदय' हे सर्व भावना, आनंद आणि प्रेमाचं केंद्रस्थान आहे आणि असंच ह्रदय अनेक (खरंतर प्रत्येक) पदार्थांना असतं - जिथे त्या पदार्थामधील प्रमुख घटक भरलेला असतो. खाण्याचे शौकीन असलेल्या जॉर्जियन लोकांमध्ये असे पदार्थ बनविण्याची कलात्मकता ठासून भरलेली दिसते. याच पंक्तीतील जगभरात नावाजलेला पदार्थ म्हणजे ‘खाचापुरी' किंवा ‘खाच्यापुरी'. हाच उच्चार एकदा 'hatch-a-pooree' असाही करून बघा.

Image result for Pizza  

थीम केकने दिली ओळख

जॉर्जियाचा कोणताही सण-उत्सव किंवा सेलिब्रेशन या पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही. स्टार्टर, मुख्य पदार्थ किंवा गोड पदार्थ अशा सर्व प्रकारांमध्ये मोडणारा हाँ पदार्थ सर्व प्रदेशांमध्ये आणि कोणत्याही वेळेला खाल्ला जातो. म्हणूनच ‘जॉर्जिया’चा राष्ट्रीय पदार्थ म्हणून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. ‘खाचापुरी' हा सेलिब्रेशन साजरं करण्यासाठी खाल्ला जाणारा पदार्थ असल्याने एकेकाळी मयताच्या जेवणामध्ये या पदार्थाचा समावेश करणे अपमानकारक मानले जाई. मात्र पुढे नाक्यानाक्यावर उघडलेल्या बेक-यांमुळे आणि स्वस्त व सहज उपलब्धतेमुळे या पदार्थाचा मयताच्या जेवणातही समावेश झाला.

Image result for Pizza
जाडसर कणकेच्या रोटीमध्ये भरलेले भरपूज चीज, बटर आणि अंड खात असाल तर त्यावर अंड फोडून केवळ भाजलेला बोटीसारखा दिसणारा अतिशय साधा तरीही चविष्ट पदार्थ म्हणजे ‘खाचापुरी'. भारतीय भाषेत सांगायचे झाले तर ‘खाचापुरी' म्हणजे चीज भरलेला नान. इटालियन लोकांसाठी तो पिझ्झा आणि म्हणूनच जॉर्जियामध्ये त्याला 'जॉर्जियन पिझ्झा' असेही म्हणतात.

जंक फूड खाताय...? सावधान

Image result for georgian pizza

खाचापुरी हा शब्द ‘खाचो' म्हणजेच ‘चीज' (कॉटेज) आणि ‘पुरी' म्हणजेच ‘ब्रेड' यापासून तयार झालेला आहें. जॉर्जियाच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता आजूबाजूला असलेल्या प्रदेशांमधून भाजलेला ब्रेड आणि युरोपातून आलेलं चीज अशा दोन्ही पदार्थांच्या संगमातून या पदार्थाची निर्मिती झाली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘खाचापुरी'च्या शोध नेमका कसा आणि कधी लागला याबाबत अद्याप ठोस पुरावे सापडलेले नाहीत. परंतु अनेक खाद्य अभ्यासकांच्या मते, ‘खाचापुरी' हा ‘पिझ्झा'चा पुर्वज मानला जातो. रोमन सैन्यामार्फतच ब्रेड आणि चीज जॉर्जियामध्ये आणले गेले. मात्र, परतताना ते आपल्यासोबत ‘खाचापुरी' हा नवीन पदार्थ घेऊन गेले. एवढंच नव्हे तर सोळाव्या शतकापर्यंत युरोपला टोमॅटोची ओळख झालेली नव्हती. रोमन सैन्य काळ्या समुद्रातील लष्करी कारावाईनंतर परतत असताना ‘खाचापुरी' आणि ‘टोमॅटो’ स्वत:सोबत घेऊन गेले. पुढे टोमॅटोची पेस्ट तयार झाली आणि त्याचा वापर ‘पिझ्झा'मध्ये केला जाऊ लागला. 

भेंडी खाल्यानंतर 'या' दोन गोष्टी खाणे टाळा

Image result for georgian pizza

'खाचापुरी'ला बोटीसारखा आकार कसा प्राप्त झाला या संदर्भातील कहाणी मजेदार आहे. या आकाराचा संदर्भ काळ्या संमुद्रातील ‘अडजारा' (Adjara) या समुद्रकिनारी असलेल्या प्रदेशाशी जोडला जातो. एकेकाळी ‘अडजारा' हे बोटी बांधण्याचे प्रसिद्ध ठिकाण होते. ‘खाचापुरी'चा जन्म तेथे झाला असावा आणि बोटी बांधणा-या कामगारांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘खाचापुरी'ला बोटीचा आकार देण्यात आला असावा असा अभ्यासकाचा अंदाज आहे. 

इटालियन ते व्हिगन पिझ्झा; पुण्यातले टॉप टेन पिझ्झा स्पॉट

Related image

जॉर्जियाचा प्रत्येक प्रदेश आपल्या खास ‘खाचापुरी'साठी प्रसिद्ध आहे. एवढंच नव्हे तर ‘खाचापुरी' बनवण्याची प्रत्येक कुटुंबाची अशी गुप्त पाककृती आहे. ती एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरीत केली जाते आणि प्रत्येकजण आपली ‘खाचापुरी' कशी चविष्ट आणि वेगळी आहे याचा अभिमान बाळगून असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: origin of italian pizza information in marathi

Tags
टॉपिकस
Topic Tags: