उन्हाळ्याच्या दिवसांत शिजलेले अन्न खराब होण्यापासून असे वाचवा; या आहेत टिप्स

prevent cooked food from spoiling in summer days Nagpur news
prevent cooked food from spoiling in summer days Nagpur news

नागपूर : उन्हाळ्यात अन्न मोठ्या प्रमाणात खराब होत असते. दिवसेंदिवस वाढत जाणारी ऊन याला जबाबदार असते. यामुळे गृहिणींसमोर प्रश्न उपस्थित होतो अन्न ठेवायचे कुठे? कारण, अन्न खराब होणे हे चांगले समजले जात नाही. आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहे.

उरलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवत असतो. मात्र, प्रत्येकच फ्रिजमध्ये ठेवता येत नाही. काही अन्न बाहेरच ठेव लागले. मात्र, वाढत्या उन्हामुळे हे अन्न खराब होते. उन्हाळ्यात शिजलेले अन्न लवकर खराब करायचे नसल्यास लक्ष देणे गरजेचे होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला याच्या काही टिप्स सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही उरलेले अन्न खराब होण्यापासून वाचवू शकता.

जास्त काळ सोडू नका

तुम्ही थंड हवामानात चार ते पाच तास शिजवलेले अन्न ठेवले तरी ते खराब होणार नाही. सकाळी अन्न शिजवले जाते आणि सायंकाळपर्यंत ते खराब होते. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की उन्हाळ्याच्या दिवसात शिजवल्यानंतर सुमारे दोन तासांत ते खावे. दोन तासांनंतर हळुहळू अन्न आंबट होऊ लागते. अशा परिस्थितीत आपण अन्न दोन तासांच्या आत खावे जेणेकरून ते खराब होणार नाही.

दुसऱ्या भांड्याचा करा वापर

उन्हाळ्याच्या दिवसात जुन्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यात अन्न ठेवणे तर लवकर खराब होत नाही. जेव्हा अन्न शिल्लक उरते तेव्हा ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवू शकतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. यामुळे जेवणही ताजे राहते. विशेषत: लहान मुलांचे उरलेले अन्न नव्या पात्रातच ठेवले पाहिजे.

जेवण एकत्र मिसळू नका

कोणत्याही हंगामात अन्न खराब होण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे बरेच अन्न मिसळणे आणि ते एकाच भांड्यात ठेवणे. अशा परिस्थितीत वेगवेगळी भांडी वापरणे चांगले. कोणत्याही एका पात्रात डाळ-तांदूळ किंवा भाजी कधीही ठेवू नका. जुने अन्न कधीही ताजे अन्नामध्ये मिसळू नका. फास्ट फूडला वेगळ्या भांड्यात ठेवा.

अन्न वारंवार गरम करू नका

सहसा असे दिसून येते की बऱ्याच स्त्रिया वारंवार गरम करून अन्नाचे सेवन करतात. शिजवलेले अन्न एकापेक्षा जास्त वेळा गरम केल्यावर खराब होते. यासाठी एकदा गरम झाल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्यांदा गरम केल्याशिवाय आपण ते खाऊ शकता. कधीही फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवू नका. कारण, शिजविलेले अन्न देखील खराब करू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com