esakal | माझी पाककृती : रबडीतले गुलाबजाम I Gulabjam
sakal

बोलून बातमी शोधा

Rabadi Gulabjam

माझी पाककृती : रबडीतले गुलाबजाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- राजश्री बिनायकिया, चिंचवड

साहित्य : २५० ग्रॅम रताळी, एक वाटी वरईचे पीठ, दीड वाटी साखर, ५० ग्रॅम खवा, तळणीसाठी तूप किंवा रिफाइंड तेल, दीड लिटर दूध, बदाम काप एक टेबलस्पून.

कृती :

प्रथम रताळी धुऊन स्वच्छ करून उकडून घेणे.

त्यानंतर ती सोलून स्मॅश करणे. त्यामध्ये वरईचे पीठ घालून चांगले मळून घेणे. त्याचे छोटे छोटे गोळे करून रिफाइंड तेलात किंवा तुपामध्ये मंद आचेवर तळणे.

दुधामध्ये खवा घालून दूध दाटसर आटवून घेणे. त्यामध्ये जरूरीप्रमाणे साखर घालून वर वेलदोडे पूड घालणे.

दूध रबडीप्रमाणे दाटसर झाल्यावर गॅस बंद करणे.

त्यानंतर एका बाऊलमध्ये रबडी काढून घेणे. त्यामध्ये गुलाबजाम सोडणे. त्यावरून बदाम काप टाकणे.

थंड झाल्यावर सर्व्ह करणे.

सूचना : रबडी करताना सतत चमच्याने हलवत राहावे म्हणजे भांड्याला खाली दूध लागणार नाही.

loading image
go to top