esakal | घरच्या घरी बनवा झटपट 'राजमा पॅटी बर्गर', ही आहे रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

घरच्या घरी बनवा झटपट 'राजमा पॅटी बर्गर', ही आहे रेसिपी

घरच्या घरी बनवा झटपट 'राजमा पॅटी बर्गर', ही आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - फास्ट फूड म्हटल की पहिली पसंती असते बर्गरला. तुमच्या पैकी बहुतेक जण ते आवडीने खातात. तर आज तुम्हाला लज्जतदार अशा पॅटी बर्गर रेसिपीविषयी सांगणार आहोत. हे बर्गर बनवणे खूपच सोपे आहे. तेही ३० मिनिटांमध्ये तयार होईल. तर चला जाणून घेऊन राजमा पॅटी बर्गर (Rajma Patty Burger Recipe In Marathi) रेसिपीविषयी...

पाककृती

ही रेसिपी बनवण्यासाठी एका वाटीत उकडलेला राजमा, बटाटे, मटर आणि ब्रेडचे छोटे तुकडे आणि मसाले टाकून एकत्र करा. त्याला टिक्क्याचे आकार द्या. टिक्क्याला मक्याचे पीठ आणि ब्रेड क्रम्ब्समध्ये बुडवा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. बन पाव घ्या आणि ती टोस्ट करा. आता बर्गर पॅटी, चीज, चिरलेला कांदा आणि टोमॅटो एकत्र करा. वरुन आपल्या आवडीचे साॅस टाका. बन पाव बंद करुन फ्राय करा. खायला बर्गर तयार.

loading image
go to top