Recipe : मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा टेस्टी ब्रेड उत्तपम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recipe

Recipe : मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा टेस्टी ब्रेड उत्तपम

Bread Uttapam : मुलांच्या डब्याला रोज नवीन काय द्यावे असा प्रश्न असतो. त्यात ते मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टीदेखील असायला हवे असते. तुमच्या या समस्येवर एक पर्याय देत आहोत. ब्रेड उत्तपम ही एक आरोग्यदायी आणि चवदार रेसिपी आहे, जी तुम्ही सहज तयार करू शकता. रव्यापासून बनवलेल्या या डिशमध्ये अनेक भाज्या घालता येतात. मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही ही डिश बनवू शकता. याशिवाय जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडसोबत बनवू शकता. ते बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

हेही वाचा: Recipe : रेड वेल्वेट बॉल्सची सोपी रेसिपी; घरीच ट्राय करा, मुलांनाही आवडेल

साहित्य

 • २ ब्रेडचे तुकडे

 • कप रवा

 • अर्धा कप दही

 • १ टीस्पून किसलेले आले

 • १ लहान बारीक चिरलेला कांदा

 • १ लहान बारीक चिरलेली सिमला मिरची

 • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

 • १ लहान बारीक चिरलेला टोमॅटो

 • चवीनुसार मीठ

 • तूप

हेही वाचा: Recipe: ढाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करायची?

कृती

 • सर्व प्रथम, ब्रेडची साइड कापून घ्या आणि त्याच्या पांढऱ्या भागावर थोडेसे पाणी लावून मऊ करा.

 • आता रवा आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा.

 • आता या पेस्टमध्ये भाज्या घाला आणि मीठ देखील घाला.

 • आता ही पेस्ट ब्रेडवर लावा आणि नंतर तवा गरम करून त्यावर थोडे तेल टाकून ब्रेड उत्तपम बनवा.

 • दोन्ही बाजूंनी नीट भाजून झाल्यावर लगेच दुसरीकडे वळवा.

 • ब्रेड उत्तपम तयार आहे, सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: Recipe Bread Uttapam Healthy And Tasty Recipe For Lunch Box

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..