रेसिपी : कपकेक

Cupcake
Cupcake

कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकजण चांगले शेफ बनले आहेत. घराबाहेर पडणे आणि बाहेरच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी घरीच तयार करणे सोईस्कर आहे. कपकेक्स हे सर्वांना आवडतात. अगदी सोप्या पद्धतीने कपकेक्स तुम्ही घरी तयार करू शकता. जाणून घ्या कपकेक्सची सोपी रेसिपी !

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साहित्य -
१ कप मैदा, कोको पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चॉकलेट चिप्स, व्हॅनिला इसेन्स, व्हिनेगर, तेल, पाणी. (कोको पावडर अनस्विटेन्ड म्हणजेच गोड नसणारी वापरावी. ती नसल्यास चॉकलेट पावडर वापरू शकता.)

कृती -
एका बाऊलमध्ये चाळणीतून एक कप मैदा, दोन चमचे कोको पावडर, अर्धा कप पिठीसाखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या. चाळणीतून हे सर्व व्यवस्थित चाळून घ्यावे. त्यामध्ये अर्धा कप पाणी, दोन चमचे तेल, तीन-चार थेंब व्हॅनिला इसेन्स, एक चमचा व्हिनेगर टाकून चांगले एकजीव करून घ्या. या बॅटरमध्ये चॉकलेट चिप्स, काजू, बदाम, अक्रोड यांचे तुकडे  आपल्या आवडीप्रमाणे टाका.

कपकेक्ससाठी सिलिकॉन किंवा कागदी कप्सचा वापर करू शकता. कप्सच्या भांड्यामध्ये कागदी कव्हर ठेवून त्यात तयार केलेले बॅटर भरा. कपकेक्स बेक करण्याआधी कुकर १० मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्यावा. त्याच्या तळाशी थोडे मीठ टाका. गरम केलेल्या कुकरमध्ये मिठावर एक भांडे ठेवा आणि त्यावर एका ताटलीवर कपकेक्स बेक करण्यासाठी ठेवून द्या. कुकरच्या आकाराचे झाकण ठेवा. मध्यम आचेवर कपकेक्स १५-२० मिनिटे बेक करून घ्या. टूथपिक कपकेकमध्ये टाकून ते व्यवस्थित बेक झाले आहेत का तपासा. सजावट करण्यासाठी कपकेक्सवर चॉकलेट, क्रिम वापरू शकता. तुमचे यम्मी कपकेक्स तयार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com