झटपट बनवा चवदार 'अक्की रोटी', जाणून घ्या रेसिपी

ही रोटी लंच आणि डिनरमध्येही खाल्ली जाऊ शकते
akki roti
akki rotiakki roti

औरंगाबाद: भारतीय खाद्य संस्कृतीत अनेक प्रकारच्या चपात्या किंवा पोळ्या दिसतात. देशातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या/पोळ्या/ धपाचे खाण्यासाठी तयार केले जातात. त्याची तयार करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. कर्नाटकमध्ये 'अक्की रोटी' प्रसिद्ध आहे. ही रोटी लंच आणि डिनरमध्येही खाल्ली जाऊ शकते. ही रोटी खाताना यासोबत कोणत्या भाजीचीही गरज नसते. अक्की रोटी (akki roti making) ही तांदळापासून बनवली जाते तसेच ती बरीच स्वादिष्टही असते. चला तर जाणून घेऊया अक्की रोटी कशी बनवायची...

साहित्य-

1 कप तांदळाचे पीठ

1 छोटा कांदा चिरलेला

3 चमचे नारळाचा किस

अर्धा चमचा किसलेले गाजर

2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या

२-3 चमचे बारीक केलेली कोथिंबीर

1/2 चमचे जिरे

मीठ चवीनुसार

1/2 चमचा आले

आवश्यकतेनुसार पाणी

1 चमचा तेल

१ चमचा भिजवलेली हरभरा डाळ

Step 1

पहिल्यांदा सर्व साहित्य एकत्र करून ते मळून घ्या.

Step 2

गरजेनुसार पाणी ओतून पीठ मळल्यानंतर ते एक ते दोन मिनीट एका भांड्यात काढून ठेवा.

Step 3

त्यानंतर तुम्ही त्या पीठाची गोल आकाराची रोटी थापू शकता किंवा तव्यावरही तुम्हाला रोटीचा आकार देता येईल.

Step 4

दोन्ही बाजूंनी थोडे तेल किंवा तूप टाकून भाजून घ्या.

Step 5

ती व्यवस्थिती भाजल्यानंतर सर्व करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com