रेसिपी : चिरमुऱ्याचे अप्पे

तयार गरमागरम अप्पे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करा.
रेसिपी : चिरमुऱ्याचे अप्पे
रेसिपी : चिरमुऱ्याचे अप्पे sakal

साहित्य : १ वाटी चिरमुरे (मुरमुरे), अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचे आले, १ शिमला मिरची, अर्धा कप बारीक चिरलेली कोबी, १ चमचा जिऱ्याची पूड, मीठ, तेल, १ चमचा धनेपूड, हळद.

कृती : सर्वप्रथम चिरमुरे (मुरमुरे) थोड्या पाण्यामध्ये ५ मिनिटे भिजत घालावेत. त्यानंतर पाणी निथळून मिक्सरमध्ये चिरमुरे, बारीक रवा, दही, हिरव्या मिरच्या, आले, शिमला मिरची, कोबी घालून फिरवून घ्यावे. तयार झालेले मिश्रण एका पातेल्यात काढून घ्यावे. त्यामध्ये जिऱ्याची पूड, मीठ, धनेपूड अणि चिमूटभर हळद घालावी अणि एकजीव करून घ्यावे. अप्पेपात्र घ्या, त्याला थोडे तेल लावा. मग तयार केलेले मिश्रण चमचाने त्याच्यामध्ये घालावे आणि वरून झाकून ठेवावे.

तीन- चार मिनिटांनी त्याला पलटून खालची बाजू वर येऊ द्या. एकदा सोनेरी रंग आल्यावर त्यांना पात्रातून काढून घ्या. तुमचे अप्पे तयार आहेत. तयार गरमागरम अप्पे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com