रेसिपी : सोलाण्याचे वडे

थंडीच्या दिवसांत ओले चणे खाणे बहुतांश सर्वांना आवडते.
सोलाण्याचे वडे
सोलाण्याचे वडेsakal

थंडीच्या दिवसांत ओले चणे खाणे बहुतांश सर्वांना आवडते. सोले किंवा ओले हरभरे थंडीच्या दिवसांमध्ये मुबलक मिळतात. ओला हरभरा प्रथिने आणि ‘ब’ जीवनसत्त्वयुक्त असतो. सर्दी झाल्यास तो कफ कमी होण्यास मदत करतो. ताज्या हरभऱ्यांची चव थोडीशी गोडसर आणि तुरट लागते. ऋतूनुसार पिकणाऱ्या भाज्या आणि त्याचबरोबर कडधान्यांचाही आहारामध्ये समावेश असावा.

साहित्य : १ कप ताजा हरभरा, १/४ कप भाजणीचे पीठ, १/२ कप शेपू, ३-४ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा जिरे, १ चमचा लिंबाचा रस, ७-८ लसूण पाकळ्या, मीठ, १/४ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला.

सोलाण्याचे वडे
रेसिपी : चिरमुऱ्याचे अप्पे

कृती : हरभरा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे घालून भरड काढून घेणे. भरड एका भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला शेपू, लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. या मिश्रणामध्ये मावेल इतपत भाजणीचे पीठ घालून घट्टसर गोळा करून घ्यावा. या गोळ्याचे छोटे चपटे वडे करून घ्यावेत. हे वडे तव्यावर शॅलो किंवा डीपफ्राय करून गरमागरम खावेत.

टीप : या वड्यांमध्ये शेपू घातला आहे, हे या कानाचे त्या कानाला कळणार नाही. तरीपण आवडीप्रमाणे तुम्ही पालक, मेथी घालू शकता. भाजणीचे पीठ नसेल, तर ज्वारीचे पीठ वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com