मेदू वडा बनवायचा आहे? तोही घरच्या घरी; मग 'या' सोप्या टिप्स जाणून घ्या..

बाळकृष्ण मधाळे
Sunday, 21 February 2021

गरमागरम आणि कुरकुरीत वडा आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ. या वड्याचा स्नॅक्स म्हणून देखील सर्रास वापर होतो.

सातारा : गरमागरम आणि कुरकुरीत वडा आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ. या वड्याचा स्नॅक्स म्हणून देखील सर्रास वापर होतो. भारतात खास करुन  महाराष्ट्रात वड्याचे बरेच प्रकार पडतात. हा वडा खायला खारट असला तरी, बर्‍याचदा टोमॅटो सॉस, नारळाची चटणी आणि सांभरसोबत याचा आस्वाद घेतल्यास हा वडा आणखी चविष्ट लागतो. आपण या वड्याला न्याहारी किंवा दुपारचे जेवणासाठी देखील डिशमध्ये ठेवू शकता.

गरमागरम आणि कुरकुरीत वडा आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ. या वड्याचा स्नॅक्स म्हणून देखील सर्रास वापर होतो. वड्याबद्दल आपल्याला माहिती असेलच आणि आपण त्याची चव देखील चाखली असेल, पण आज आपण मेदू वड्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे दक्षिण भारतीय वड्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. डोनटच्या देसी चुलतभावासारखा दिसणारा हा वडा खारट असला, तरी नाश्त्यासाठी फार उपयुक्त आहे.

Image result for मेदू वडा

बर्‍याचदा टोमॅटो सॉस, नारळाची चटणी आणि सांभरसोबत हा खाला जातो, ज्याने अधिक चव अनुभवता येते. आपण याला न्याहारी किंवा दुपारच्या जेवणात देखील खाऊ शकता. सकाळच्यावेळी हा मेदू वडा खाल्यास अभूतपूर्व चव चाखता येऊ शकते. मेदू वडाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या कुरकुरीत स्नॅकबद्दल शेफ गॉर्डन रामसे सांगतात, जेंव्हा हा पदार्थ मी करायला घेतला, त्यावेळी तो थोडा कठीण वाटत होता. मात्र, नंतर हा वडा सहजरित्या मला करता येऊ लागला. त्यानंतर या वड्याची रेसिपी मी ट्विटरवर शेअर केली, त्याला खूप जणांनी पसंती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. ह्या मेदू वड्याचा गोल्डन ब्राऊन कवच अतिशय सुंदर आहेच, शिवाय कुरकुरीत असणारा हा वडा खायला देखील चविष्ट असल्याचे रामसे सांगतात.

Image result for मेदू वडा

आपल्यापैकी बर्‍याच जणांनी ही रेसिपी पाहिली आणि घरी बनवण्याचा प्रयत्न देखील केला, पण ती खूपच अवघड होती. मात्र, या पुढे असे होणार नाही. ई-सकाळची ही रेसिपी तुम्हाला घरीच मेदू वडा बनविण्यास मदत करेल, तीदेखील तुमच्या वेळेत. आपल्याला थोडीशी भिजलेली उडीद डाळ, हिंग, मीठ, कोथिंबीर, मिरपूड, आले, हिरवी मिरची घ्यावी लागेल. सध्या आपल्याकडे हे घटक असल्यास, आजच वडा बनवण्याचा का आपण प्रयत्न करत नाही?

Image result for medu vada

मेदू वडा कसा बनवायचा येथे पहा.. 

  • थोडीशी भिजलेली उडीद डाळ घ्या आणि पेस्टमध्ये बारीक करा.
  • मीठ, मिरपूड पूड, हिंग घाला आणि चांगले मिक्स करुन घ्या.
  • हिरवी मिरची, आले, कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  • आपल्या हाताच्या तळव्यावर एक पिठाचा तुकडा घ्या आणि त्या हाताने गोलाकार वडा बनवा, मध्यभागी छिद्र देखील करायला विसरु नका.
  • वडा पिवळसर होईपर्यंत मध्यम आचेवर गरम करा
  • स्टीलच्या भांड्यात किंवा किचन टॉवेल, टिश्यू पेपरमध्ये गरम वडे ठेवा व भांड्यातील तेल काढून टाका. त्यानंतर हा वडा आपल्या आवडीनुसार, चटणी किंवा सांबरसोबत खाऊ शकता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Learn Special Tips For Making Medu Vada At Home