हेल्दी फूड : आहारातील ‘पोट’भेद

Healthy-Food
Healthy-Food

आपण लहानपणी काय खाल्ले त्यानुसार भविष्यात आपल्या शरीरावर त्याचा परिणाम दिसत असतो. बालपणी खाल्लेल्या अन्नघटकांचा परिणाम सुमारे वीस वर्षांनंतर आपल्या आतड्यांसह शरीरावर दिसत असतो, असे एका संशोधनात सांगितले आहे. दिवसेंदिवस आतड्यांची क्षमता कमी होत जाणे ही आजकालची सामान्य तक्रार आहे. यावर महत्त्वाचे म्हणजे अपचन, पोटात गॅस निर्माण करणारे अन्न पदार्थ आपण शक्यतो टाळले पाहिजेत. कोणते अन्नपदार्थ आपल्या शरीरासाठी तसेच तब्येतीसाठी चांगले आहेत कोणते हानिकारक आहेत याची आपल्याला माहिती असलीच पाहिजे. आतडी खराब झाल्यावर त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेसह नखे, केस आणि संपूर्ण तब्येत आणि शरीरावर होत असतो, हे आपण लक्षात घेणे अत्यावश्यकच आहे.

आतडी खराब होण्याचे मुख्य कारण आपण बालपणी प्रक्रिया केलेले आणि चरबीयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर केलेले सेवन हे असते. पालक म्हणून मुलांना कोणते पदार्थ आवडतात ते लक्षात घेऊन योग्य प्रकारे शरीराचे पोषण होईल असेच खाद्यपदार्थ द्यायचा आपला प्रयत्न असतो. परंतु आता बदलत्या युगात पॅकबंद खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्या आकर्षक पॅकिंगमध्ये आणि चुकीच्या गोष्टी सांगून मुलांना आकर्षित करत आहेत. मुलांमध्ये त्या पदार्थांची चव विकसित करणे आणि त्यांना अशा पद्धतीचे फास्टफूड खाण्याची व्यसन लागावी यासाठी या कंपन्यांचा प्रयत्न असतो, हा धोका आजकालच्या पालकांनी लक्षात घेतला पाहिजे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फास्ट फूडचा धोका समजण्याइतकी इतकी आजची पिढी सक्रिय किंवा सक्षम नाहीत, हे दुर्दैवी आहे. बालपणी आपले पालनपोषण झाले तो काळ, ते वातावरणात खरोखरच खूपच चांगले होते. तुम्ही तुमच्या मुलांना सकाळी किती सकस अन्न खायला देता यावर सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येईल, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आयुष्यभरासाठी तुम्हाला आतड्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कायमस्वरूपीसाठी दुखणे मागे लागू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या मुलांचे आपल्याप्रमाणे नुकसान होऊन त्यांना प्रोबायोटिक औषधे घ्यावी लागू नयेत म्हणून आतापासून काळजी घेऊयात...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com