
Snacks Recipe : माहितीच नव्हतं? शिळ्या चपातीपासून हे असं काहीतरी भन्नाट बनवता येतं!
किती बाहेर खायची सवय लागलीय? घरचं अन्नही खाण्यात इंटरेस्ट नसल्याने लोक बाहेरच्याच पदार्थांवर ताव मारतात. आणि मग घरातल्या मंडळींची ओरड सुरू होते. बाहेरचं खाऊन घरातले चिडतात आणि दुसऱ्या दिवशी शिळं खावं लागतं. त्यामूळे तूमचा मुडही ऑफ होतो.
प्रत्येक घरात शिळा राहिलेला भात परतून खाल्ला जातो. पण, राहिलेल्या चपातीचं काय करायचं हेच कळत नाही. त्यामूळे चपाती अजून शिळ्या करून गायीला दिल्या जातात. किंवा मग तेल लावून पुन्हा परतून खाल्ल्या जातात. त्यामूळेच आज असा एक भन्नाट पदार्थ पाहुयात. जो तूम्ही एकदा बनवलात तर घरातले शिळ्या चपात्या क्षणात फस्त करतील आणि तूमचं कौतूकही करतील.
चपाती फ्राय करून त्यावर चटणी मीठ मसाला टाकून खाणे हे सवयीचं झालं असेल. तर त्याचीच एक पुढची पायरी काय आहे हे पाहुयात. नाचोज हे नाव तूम्ही ऐकलंच असेल. तेच चायनिज स्टॉलवर मिळणारे नाचोज आज आपण घरी बनवूयात.
सर्व प्रथम शिळ्या चपाती छोट्या छोट्या त्रिकोण आकरात कापून घ्या. कापल्यानंतर कडक तेलात त्या फ्राय करून घ्या. त्यानंतर वरून मीठ आणि तिखट घालून मिक्स करा. नाचोजसाठी लागणारा सालसा बनवण्यासाठी एका भांड्यात टोमॅटो, कांदा, कोथंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, लिंबू, लाल तिखट आणि टोमॅटो केचअप घालून मिक्स करा. हा तयार सालसा बाजूला ठेऊन द्या.
नाचोजला अधिक चवदार बनवण्यासाठी आपण फ्रेश क्रीम घेऊयात. ती चांगली फेटून घ्या. त्यात दोन चमचे दही, मीठ आणि लिंबू घालून चांगले मिक्स करा. आता एका भांड्यात नाचोस टाका, त्यात सालसा, चीज आणि क्रीम घाला. हा पदार्थ चटपटीत, चवदार असल्याने कोणत्याही वेळी भूक भागवण्यासाठी तूमच्या उपयोगी पडेल. आणि त्यामूळे शिळ्या चपात्याही शिल्लक राहणार नाहीत.