esakal | घरीच तयार करा टोमॅटोची प्युरी; वर्षभराची मिटेल चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

घरीच तयार करा टोमॅटोची प्युरी; वर्षभराची मिटेल चिंता

घरीच तयार करा टोमॅटोची प्युरी; वर्षभराची मिटेल चिंता

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : टोमॅटो सगळ्याच प्रकारच्या जेवणात वापरले जाते. भाजी कोरडी असो किंवा ग्रेव्ही त्यात टोमॅटो असतोच. दररोज लागणाऱ्या टोमॅटोची किंमत वाढतच चालली आहे. आजघडीला याची किंमत तीस रुपये प्रतिकिलो झाली आहे. जेव्हा टोमॅटोची किंमत कमी असते तेव्हा त्याचा साठा करून ठेवा. टोमॅटो दोन ते चार दिवसांत खराब होतो, मग त्याचा साठा कसा करू शकतो, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची प्युरी बनवून वर्षभर ठेवण्याची ट्रिक. (Tomato-puree-Food-News-Dearness-nad86)

टोमॅटोची प्युरी जवळपास प्रत्येक भाजीत वापरतात. तुम्ही एकदा टोमॅटो प्यूरी बनवली तर ती वर्षभर वापरू शकतात. यासाठी आपल्याला एक किलो टोमॅटो, मीठ, साखर आणि थोडं पाणी पाहिजे.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

सगळ्यात आधी टोमॅटोला दोन छोटे चीर करा. हे चीर जास्त खोल नसले पाहिजे आणि टोमॅटोच्या खालच्या भागात असले पाहिजे. यामुळे टोमॅटोचे साल काढायला सोपे होईल. आता मोठ्या भांड्यात गरम पाणी करा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात टोमॅटो २-३ मिनिटांसाठी ठेवा. टोमॅटो थंड झाल्यानंतर त्यांना बाहेर काढा आणि त्याचे साल काढा. यानंतर टोमॅटोला कापून मिक्सरमध्ये टाका आणि त्याची पेस्ट तयार करा. एक गाळणी घ्या आणि ही पेस्ट गाळून घ्या.

या प्युरीला पुन्हा एकदा गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर यात मीठ आणि साखर घाला. यामुळे टोमॅटोची प्युरी खराब होणार नाही. ही टोमॅटो प्युरी जास्त काळ टिकवण्यासाठी आइसट्रेमध्ये ठेवा. आता तुम्हाला जेव्हा भाजी बनवताना टोमॅटो प्युरी लागेल तशी तुम्ही वापरू शकतात.

(Tomato-puree-Food-News-Dearness-nad86)

loading image