भाजीत तेल जास्त झालं? या टिप्सचा करा वापर आणि वाढवा चव

भाजीत तेल जास्त झालं? या टिप्सचा करा वापर आणि वाढवा चव

नागपूर : भारतीय संस्कृती सर्वोत्तम आहे. घरी आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान केला जातो. त्यांना जेवणासाठी विचारले जाते. घरी आलेला व्यक्ती उपाशी जाऊ नये अशी आपली संस्कृती आहे. यामुळे पाहुण्यांसाठी वेगवेगळे व्यंजन तयार केले जाते. मात्र, असे करीत असताना कधीकधी भाजीत जास्त तेल टाकले जाते. यामुळे जेवणाचा स्वाद बिघडतो. अशावेळी जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी काय करायचे हे आपण जाणून घेऊ या... (Too-much-oil-in-made-vegetable?-Use-these-tips-and-enhance-the-taste)

बऱ्याचवेळा घरची स्त्री मनापासून भाजी तयार करते. मात्र, भाजी तयार केल्यानंतर काही ना काही कमी राहून जाते. कधी जास्त मीठ, कधी कमी, कधी जास्त तिखट तर कधी कमी तेल होऊन जाते. अशावेळी भाजीची चव कशी टिकवायची असा प्रश्न पडतो. भाजीत तेल जास्त झाले तर भाजीमध्ये वरच्या बाजूस तरंगू लागते. एवढेच नाही तर हे तेल भाजीचा रंग आणि चव दोन्हीही खराब करते. अशावेळी स्वयंपाकघरातील काही खास टिपांसह आपण त्याची चव टिकवून ठेवू शकतो. हेच आपण आज पाहणार आहोत...

भाजीत तेल जास्त झालं? या टिप्सचा करा वापर आणि वाढवा चव
राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

उकडलेल्या बटाट्याचा करा वापर

भाजीत जास्त तेल झालं असेल तर त्यात उकडलेले बटाटे टाका. तुम्ही बटाटे उकळा आणि नॉन-स्टिक पॅनमध्ये हलके भाजून घ्या आणि कढीपत्तामध्ये मिक्स करून शिजू द्या. यानंतर हे बटाटे भाजीत टाकून कमीतकमी पाच मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजी झाकून ठेवा. काही वेळांनी तुम्ही भाजी उघडून बघाल तर भाजीतील तेल बटाट्यामध्ये शोषले गेलेले दिसेल. त्याची चव देखील अबाधित आहे. यानंतर आवडीनुसार भाजीत मीठ आणि मसाले मिसळू शकता.

टोमॅटो पुरी

भाजीमध्ये तेल जास्त दिसत असेल तर हे तेल काढून त्यात टोमॅटो प्युरी टाकून भाजून घ्या. थोडावेळ भाजल्यानंतर भाजीत प्युरी घाला. कोरड्या भाजीत तेल जास्त असल्यास प्रथम भाजीला तेलापासून वेगळे करा आणि नंतर पॅनमध्ये उरलेल्या तेलात टोमॅटो प्युरी भाजून घ्या. पुरी चांगली भाजली की वरून बनवलेले भाजी घाला. दोन मिनिटे झाकून ठेवा आणि मंद गॅस सुरू ठेवा आणि गॅस बंद करा. असे केल्यास भाजीत तेल दिसणार नाही.

भाजीत तेल जास्त झालं? या टिप्सचा करा वापर आणि वाढवा चव
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

ब्रेड क्रम्ब्स

रस्याच्या भाजीत तेल जास्त झाल्यास त्यात थोडे भाजलेले ब्रेड क्रंब्स टाका. हे लक्षात ठेवावे की ब्रेड क्रंब्स कोरडे भाजलेले असावेत. ब्रेड क्रंब्स अधिक तेल शोषून घेतील आणि भाजीचा स्वादही टिकवून ठेवतील.

मक्याचं पीठ

तुम्ही ग्रेवीवाला चिली पनीर किंवा मंचूरिअन तयार केले आणि यात तेल जास्त झाले तर कॉर्न फ्लोर पाण्यात टाकून चांगले मिसळवा आणि वेगळ्या पॅनमध्ये चांगले शिजू द्या. ते शिजल्यानंतर मंचूरिअनमध्ये टाका. असे केल्याने अतिरिक्त तेल कॉर्न फ्लोरमध्ये मिसळले जाईल आणि चव देखील राहील.

भाजीत तेल जास्त झालं? या टिप्सचा करा वापर आणि वाढवा चव
विचित्रच! बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी बाजारात; काय आहे हा प्रकार

हरभरा पीठ वापरा

तुम्ही बटाटा, वांगे किंवा भेंडी सारखी कोरडी भाजी बनविली असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तेल जास्त दिसले असेल तर हरभरा पीठ हलके भाजून घ्या आणि भाजीत घाला. भाजीत हरभरा पीठ मिसळा आणि थोडावेळ शिजू द्या. असे केल्याने तेल हरभऱ्याच्या पिठामध्ये मिसळेल आणि भाजीही कुरकुरीत होईल. तुम्ही हरभऱ्याच्या पिठाऐवजी तांदळाचे पीठ देखील वापरू शकता.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(Too-much-oil-in-made-vegetable?-Use-these-tips-and-enhance-the-taste)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com