
पिझ्झा म्हटले की बहुतांश लोकांची जीभ चाळवते. अर्थात, वितळलेले चीझ, क्रिस्पी ब्रेड क्रस्ट, टोमॅटो सॉस आणि आपल्या आवडीचे हवे ते टॉपिंग्स घातले तर इतर खाद्यपदार्थांना त्या शीर्षस्थानी ठेवणे अशक्य होते. दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे, मध्यरात्रीच्या गप्पा असो किंवा संध्याकाळची कडकडून लागलेली भूक, पिझ्झा हा पदार्थ केव्हाही खाल्ला तरी तेवढाच टेस्टी आणि आनंद देणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक लोक थोडा वेगळे सांगतील, पण पिझ्झा खाण्यासाठी कोणतीही वेळ चुकीची नाही, असे म्हणायला हरकत नाही.
पिझ्झा म्हटले की बहुतांश लोकांची जीभ चाळवते. अर्थात, वितळलेले चीझ, क्रिस्पी ब्रेड क्रस्ट, टोमॅटो सॉस आणि आपल्या आवडीचे हवे ते टॉपिंग्स घातले तर इतर खाद्यपदार्थांना त्या शीर्षस्थानी ठेवणे अशक्य होते. दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे, मध्यरात्रीच्या गप्पा असो किंवा संध्याकाळची कडकडून लागलेली भूक, पिझ्झा हा पदार्थ केव्हाही खाल्ला तरी तेवढाच टेस्टी आणि आनंद देणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक लोक थोडा वेगळे सांगतील, पण पिझ्झा खाण्यासाठी कोणतीही वेळ चुकीची नाही, असे म्हणायला हरकत नाही. पिझ्झा हा एकमेव पदार्थ आहे, जो कधीही आणि कुठेही सहज मागवता येतो. आज फूड डिलिव्हरी ॲप्सची चंगळ असली, तरी हे विसरायला नको, की पिझ्झा हा एकमेव असा पदार्थ जो आपण वर्षानुवर्षे आधीपासून घरी ऑर्डर करत आलो आहोत.
पिझ्झावर अगदी कुठलेही टॉपिंग शक्य आहे. पिझ्झा खाणे आता फक्त डॉमिनोज, पिझ्झा हटपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. कारण आता अमेरिकन पॅन पिझ्झापासून ते ऑथेंटिक इटालियन पिझ्झा, डेझर्ट पिझ्झापासून व्हीगन पिझ्झा हे सगळे आपल्याला आता पुण्यात चाखायला मिळतात. पिझ्झाचा क्रस्ट, बेक करण्याची पद्धत-वूड फायर्ड/ओव्हन आदींबद्दल पुणेकर आता जागरूक झाले आहेत. असे वेगवेगळे आणि टेस्टी पिझ्झा मिळणारी काही निवडक ठिकाणे खालीलप्रमाणे.
बेक्ड अँड वायर्ड (कल्याणीनगर) - टेस्टी आणि चीझी वेगवेगळ्या टॉपिंग्सचे थीन क्रस्ट पिझ्झा इथे मिळतो. पण इकडची खासीयत म्हणजे इथे मिळणारा डीप डिश पिझ्झा. हा शिकागो स्टाइल पिझ्झा म्हणजे पिझ्झाप्रेमींसाठी पर्वणीच. येथील अजून एक आकर्षण म्हणजे मॉन्स्टर पिझ्झा. २८ इंच आणि चक्क ६० इंचांचा पिझ्झादेखील इथे मिळतो.
ग्रीडी मॅन पिझ्झेरिया (बाणेर) : फ्रेश थीन क्रस्ट पिझ्झा आणि कल्पक फ्लेवर्ससाठी ग्रीडी मॅन प्रसिद्ध आहे. इथला मार्घरिटा, आर्टीचोक आणि बेसिल, जर्क चिकन आणि पेप्पेरोनी पिझ्झाची चव नक्की ट्राय करण्यासारखी आहे.
क्रेझी चीझी (सदाशिव पेठ आणि इतर) - अत्यंत कमी वेळात तरुणाईला वेड लावणारे क्रेझी चीझीचा पिझ्झा आहे. एकदम चविष्ट आणि खिशाला परवडणारे दर म्हणून क्रेझी चीझी प्रसिद्ध आहे. पेपी पनीर, एक्झॉटीका, पेरिपेरी पनीर हे काही पिझ्झा नक्की ट्राय करा.
बबस्टर्स (कल्याणीनगर) - पिझ्झा बाय द स्लाइस हे बबस्टर्सचे मुख्य आकर्षण आहे. साधारण १० इंचांचा पिझ्झा स्लाइस एका माणसासाठी पुरेसा ठरतो. गारलीकी मशरूम, नवाबी पनीर, पेरिपेरी चिकन आणि पोर्क ओव्हरलोड हे काही फ्लेवर्स नक्की चव घेण्याजोगे आहेत.अगदी प्युअर व्हेज पिझ्झा प्लेसला पिझ्झाची मजा घ्यायची असल्यास खालील काही ठिकाणी नक्की जा.
ग्रीन्स अँड ऑलिव्हस (औंध)
दारिओज (कोरेगाव पार्क)
ला पिझ्झेरिया (बालेवाडी हायस्ट्रीट)
ग्रीन सिग्नल (आपटे रोड - इथे वूड फायर्ड ओव्हनवर पिझ्झा केला जातो)