खाण्यासाठी काही नवीन ट्राय करताय? तर बनवा 'पखला भात' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakhala bhat

खाण्यासाठी काही नवीन ट्राय करताय? तर बनवा 'पखला भात'

सध्या सर्वांचा बराच वेळ घरी जात असल्याने बरेच जण नवनवीन रेसिपी ट्राय करत असतील. जसे की धपाटे, पनीर धपाटा, बटाटा धपाटा, कांदा धपाटा असे अनेक रेसिपी आहेत जे तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. जर तुम्हाला अजून नवीन पदार्थ तयार करायचे असतील त्यासाठी आज एका नवीन रेसिपी जाणून घेऊया. तुम्ही घरी टेस्टी 'पखला भात'ची (pakhala bhat) रेसिपी करू शकता. ही रेसिपी तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार खावी वाटेल. चला तर जाणून घेऊया रेसिपीबद्दल.

तयार करण्याची पद्धत-

- पखला भात तयार करण्यासाठी पहिल्यांदा तांदूळ चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्या. नंतर एक-दोन कप पाण्यामध्ये उकळून घ्या. कुकरमध्ये करायचा असेल तिथं एका शिट्टीएवढा शिजवू शकता. बरेच जण एक दिवस पाण्यात तांदूळ ठेऊनही पखला भात बनवतात.

-तांदूळ उकळल्यानंतर एका भांड्यात ते काढून घ्या. त्यात मीठ आणि दही टाकून जवळपास ५ मिनीटे तसेच ठेवा. दुसरीकडे तुम्ही पॅनमध्ये तेल गरम करा.

-तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरे, लाल मिर्ची, कडीपत्ता, आलं टाकून तडखा द्या. तडका तयार झाल्यावर त्यात दह्यात मिसळलेल्या तांदळाला तडका द्या.

-तडका दिल्यानंतर तुम्ही वरून लिंबूचा रस आणि कोथिंबीर टाकून खाण्यासाठी सर्व करू शकता. (try news recepie pakhala bhat during covid 19 in home)

साहित्य-

तांदूळ- दोन कप

दही- १ कप

मीठ- चवीनुसार

आले- अर्धा चमचा

कडी पत्ता- ५-६ पाने

जीरे- अर्धा चमचा

तेल- १ चमचा

लाल मिरच्या-

कोथिंबीर- दोन चमचे

Step 1

पहिल्यांदा तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या.

Step 2

एक ते दोन कप पाण्यात तांदूळ शिजवा किंवा कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्या.

Step 3

त्यानंतर उकळलेले तांदूळ एका भांड्यात घेऊन त्यात मीठ आणि दही घाला.

Step 4

यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जीरे, लाल मिरच्या, कडीपत्ता आणि आले टाकून तडका द्या.

Step 5

तडका तयार झाल्यावर दह्यात मिक्स केलेले तांदळाला तडका द्या. त्यात वरून लिंबाचा रस, कोथिंबीर टाकून सर्व करा.

Web Title: Try News Recepie Pakhala Bhat During Covid 19 In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top