पदार्थांना सॉसशिवाय मजाच नाही तर पहा हे साॅसचे प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

आपल्या जेवणात कोणीही सॉस वापरतो. कुणाला जशी चटणी, लोणचे आवडते, तसे कुणाला जेवणात सॉस लागतो. चटपटीत जेवणात अनेक जण सॉस हमखास वापरतात.

कोल्हापूर - आपल्याला एकच सॉस माहीत असतो, तो म्हणजे टोमॅटो सॉस (केचअप). हा टोमॅटो सॉस आपण किती तरी वर्षे आहारात वापरत आलो आहोत. एखाद्या पदार्थाला चव देण्यासाठी हा टोमॅटो सॉस वापरतो; पण सॉसचे जगभरात हजारो प्रकार उपलब्ध आहेत. भौगोलिकदृष्ट्या अन्‌ देशोदेशी अनेक प्रकार निर्माण केले आहेत. एक मात्र खरे, की चहा-नाश्‍त्याला अन्‌ जेवताना सॉस हवाच. सॉस नसेल तर अनेकदा जेवण किंवा नाश्‍ता खाल्ल्यासारखा वाटत नाही.

अनेकांच्या आहारात या सॉसचा वापर

आपल्या जेवणात कोणीही सॉस वापरतो. कुणाला जशी चटणी, लोणचे आवडते, तसे कुणाला जेवणात सॉस लागतो. चटपटीत जेवणात अनेक जण सॉस हमखास वापरतात. असं म्हणतात, की जग हे एक कुटुंब झालं आहे. त्यामुळे जगभरातील अनेक प्रसिद्ध सॉस आपल्याकडे मिळू लागले आहेत. कोल्हापुरातील कोणत्याही मॉलमध्ये तुम्ही गेलात, की सॉसचा एक सेक्‍शन दिसेल. तिथे अनेक प्रकारचे, रंगांचे, चवीचे सॉस तुम्हाला पाहायला मिळतील.

सॉस तयार करणारे क्‍लासेसही

घरीही सॉस करणे सोपे आहे. टोमॅटो, एखादे फळ घ्यायचे. त्यात विविध मसाले, पालेभाज्या, फळांचे रस एकत्रित करायचे, तिखट, मीठ टाकायचे. झाला तयार सॉस. काही सॉस करायला मात्र वेळ लागतो. त्यात अनेक पदार्थ योग्य त्या पद्धतीने टाकावे लागतात. एखादा पदार्थ जास्त झाला तर त्या पदार्थाची चवच जास्त सॉसमध्ये लागते. असे व्हायला नको म्हणून आता सॉस कसे तयार करायचे, याची रेसीपी ऑनलाईन सोशल मीडियावर पाहायला मिळते. सॉस तयार करणारे क्‍लासेसही आहेत. विशेषत: जी लहान मुलं नाश्‍ता, जेवताना कंटाळा करतात. अशा वेळी लहान मुलांना एखादा पदार्थ तयार करून त्यात सॉस टाकला, की लहान मुलं ती अतिशय आवडीने तो पदार्थ खातात.
सॉसची चव आंबट, तिखट, गोड, तुरट अशी काही असते. सॉसमध्ये कुठला पदार्थ वापरला आहे, त्यावर चव अवलंबून असते.

हेही वाचा - काय आहे हे फ्युजन फुड ? 

हे आहेत सॉसचे प्रकार

कोल्हापुरातही अनेक मॉल्समध्ये टोमॅटो सॉस, मायोनीज, पास्ता सॉस, सॅलड सॉस असे अनेक सॉस मिळतात. ते थोडे महागही असतात. ब्राऊन, बटर, इमल्सीफाईड, फीश, ग्रीन, हॉट, मीट बेस्ड, स्वीट, सोया, ॲपल, व्हाईट, फ्रेश भाज्यांपासून केलेले असे काही प्रकार उपलब्ध आहेत. हे सर्व प्रकार कोल्हापुरातही मिळतात. कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट्‌समध्ये गेले, की तुम्हाला एका प्लेटमध्ये सॉस ठेवलेला दिसेल. विशेषत: कोणत्याही पदार्थात पाव असेल तर तिथे सॉस असतो. सॉस अन्‌ पाव हे एक समीकरण झाले आहे. 

सॉस मधुन शरीराला मिळतात हे घटक

सॉसमध्ये जे पदार्थ वापरले जातात, ते सर्व पदार्थ शरीराला आवश्‍यक असतात. यातून कार्बोहायड्रेटस्‌, प्रथिने, क्षार, खनिजे, जीवनसत्त्वे असे सर्व काही मिळते. ज्यांची चव गेली आहे, त्यांनी जेवण, नाश्‍त्यात सॉस ठेवला तर तो पदार्थ नक्कीच चविष्ट बनतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varieties of Sauce