Diwali Festival 2020 : शुगर फ्री मिठाई बनवायची आहे? या आहेत 5 सोप्या रेसिपी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

दिवाळीत गोड- धोड, मिठाई हे सारे पदार्थ असतातच. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांवर ताव मारण्याच्या बेतात असतात, पण कित्येकदा आनंद आणि उत्साहाच्या भरात आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. दिवाळीत आपण अतिप्रमाणात गोड खातो आणि शरीरातील फॅट्स, कॅलरीज वाढवतात.

दिवाळी म्हटंल की लाडू - पेढे- मिठाई हे असणारच!  प्रत्येकालच मनसोक्त मिठाई खायची इच्छा होत असणार पण, शुगरचा त्रास आहे? वजन वाढण्याची चिंता सतावतेय? मग चिंता करुन नका. शुगर फ्री मिठाई खा आणि दिवाळी सण साजरा करा.

दिवाळीत गोड- धोड, मिठाई हे सारे पदार्थ असतातच. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांवर ताव मारण्याच्या बेतात असतात, पण कित्येकदा आनंद आणि उत्साहाच्या भरात आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. दिवाळीत आपण अतिप्रमाणात गोड खातो आणि शरीरातील फॅट्स, कॅलरीज वाढवतात.निरोगी राहण्यासाठी नेहमी अॅक्टीव्ह असणाऱ्यांना मात्र, दिवाळीत डायेट करणे, गोड पदार्थ टाळणे अशक्य होते. अशा वेळी टेस्ट आणि फिटनेस पैकी एक निवडणे अवघड असते. सण असेल तर गोड पदार्थ तर असणार, मग कसे देणार आरोग्याकडे लक्ष? हाच विचार करताय ना,  मग काळजीकरु नका! यंदा दिवाळीत शुगर फ्री मिठाईबनवा आणि दिवाळी सण आनंदात साजरा करा. शुगरचा त्रास असलेल्यांसाठी देखील ही मिठाई उपायुक्त ठरते. चला तर मग जाणुन घ्या, घरीच्या घरीच कसी बनवायची हेल्दी आणि टेस्टी शुगर फ्री मिठाई.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

 शुगर फ्री काजू कतली

Hariyali Teej 2020 recipe Kaju Katli Know how to make Kaju Katli at home  Zayaka-Recipe: हरियाली तीज पर इस बार घर पर बनाएं हलवाई जैसी काजू कतली,  बनाने में लगेंगे सिर्फ 30
1. दोन कप काजूचे तुकडे ट्रेमध्ये घेऊन 180 से. वर 5-6 सेंकद ठेवून भाजून घ्या.
2. काही वेळ काजू थंड होऊ द्या. काजू थंड झाल्यावर एक टेबल स्पुन तूप टाकून मिक्सर मधून वाटून बारीक करून घ्या.
3. मिक्सरमध्ये 2 टेबलस्पून मध टाकून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत वाटन घ्या.
4. एका प्लेटला सर्व बाजून बटर लावून घ्या  आणि त्यावर हे मिश्रण हवे तसे करून पसरवा.
5. त्यांनतर चौकोनी आकारात कापून घ्या. शुगर फ्री काजू कतली तयार आहे.

 शुगर फ्री अंजीर बर्फी 

Anjeer Dry Fruits Barfi, Anjeer Barfi - Girnar Sweets & Farsan, Panvel |  ID: 13949641473

1.  3/4 कप शेंगदाणे, 3/4 कप अंजीर, 3/4 खजूर कापून घ्या.
2. पॅनमध्ये शेंगदाने खरपूस आणि कुरकरीत होईपर्यंत भाजून घ्या. 
3. त्याच पॅनमध्ये कापलेले अंजीर टाकून मऊ होई पर्यंत परतून घ्या. 
4. त्यामध्ये खजूर, 2 चमचे मनुके, अर्धा चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा वेलची पूड टाका. मिश्रण चिकट आणि घट्ट होईपर्यंत
परतून घ्या.
5. मिश्रण तव्याला चिटकत असल्यास थोडे तूप टाकून परतून घ्या.
6. भाजलेले शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या.
7.  मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढून परसरवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी काप करुन तुकडे करा. शुगर फ्री बर्फी तयार
आहे.

 
 शुगर फ्री खजूर लाडू

DATES AND NUTS LADOO (A HEALTHY DESSERT IN 3 MINS) - Anto's Kitchen

1.  एक कप खजून व्यवस्थित धूवन कापून घ्या. मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून बाजूला ठेवा.
2.  पॅन गरम करुन त्यात एक टेबलस्पून तूप टाकून शेंगदाणे भाजून घ्या.
3.  खरपूस भाजल्यावर त्यात खसखस आणि त्यात नारळाचा खिस टाकून घ्या.
4.  मिश्रण एक मिनिट परतून घ्या आणि त्यामध्ये खजुराची पेस्ट अॅड करा.
5.  मिश्रण व्यवस्थित एकत्र करुन घ्या. गॅसवरुन उतरवा आणि थंड होऊ द्या.
6. हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. शुगर फ्री खजुर लाडू तयार आहेत.

 शुगर फ्री चणाडाळ बर्फी

Chana Dal Burfi Recipe, How to Make Chana Dal Burfi - Milkmaid

1. एका पॅनमध्ये भिजवलेला चणा आणि 2 कप बदामाचे दुध एकत्र करुन चांगले उकळून घ्या. गॅसची आच मंद करुन झाकण ठेवा  आणि मऊ होईपर्यंत शिजवा.गॅस बंद करा आणि  मिश्रण जरा थंड होऊ द्या.  थोड्यावेळाने मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करुन घ्या.
2. तव्या मध्ये 1/4 कप तूप गरम करून घ्या. त्यामध्ये वाटलेला चणा डाळ पेस्ट टाकून परतून घ्या. मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्या.
3. त्यामध्ये खिसलेले 1/4 कप नारळ, 1 कप बदाम दुध आणि 1/2 कप काजू पेस्ट( काजू भिजूवन तयार केलेली पेस्ट), 1/4 भोपळ्याच्या बिया आणि 1/2 टेबल स्पून वेलची पूड टाकून मंद आचेवर परतून घ्या. मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर 3/4 कप मध  व्यवस्थित मिक्स करा  आणि गॅस बंद करा.
4. प्लेटला तूप लावा आणि त्यात मिश्रण काढून घ्या. मिश्रण व्यवस्थित पसरवा आणि चौकोनी काप करा.शुगर फ्री चणाडाळ बर्फी तयार आहे.

शुगर फ्री रागी लाडू

ragi ladoo recipe, how to make ragi ladoo | nachni ladoo

1. जाड तळाच्या पॅनमध्ये 2 चमचे तुप टाकून 3/4 कप रागीचे पीठ 10 ते 15 मिनिंटे कोरडे  होईपर्यंत परता. त्यांनतर ते थंड होऊ द्या.
2. मिक्सरमध्ये 3/4 कप बदाम वाटून घ्या. त्यात 3 ते 4 कप खजूर आणि 1 कप वाळलेले अंजीर आणि वाळलेले जर्दाळू टाकून
मिश्रण एकजीव होई पर्यंत वाटून घ्या.
3. मिश्रणात रागीचे पिठ टाकून सर्व व्यवस्थित एकत्र करुन घ्या. 
4. हाताला तूप लावून लाडू वळून घ्या.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to make a sugar free dessert try this simple recipe