वजन नियंत्रणात राहण्यासाठी नाश्त्यात 'या' पदार्थांचा समावेश करा

पौष्टिक आणि फॅट बर्निंग पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
Breakfast Foods that helps to Weight Loss & Fat Burning
Breakfast Foods that helps to Weight Loss & Fat BurningEsakal

सकाळी- सकाळी नाश्ता केला की दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे नियमित नाश्ता केला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक आणि फॅट बर्निंग (Fat Burning) पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये कसरतही करावी लागणार नाही. यासाठी नाश्ता करताना अश्या पदार्थाचा समावेश करा. चला तर जाणून घेऊया कोणते पदार्थ सकाळी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.(Breakfast Foods that helps to Weight Loss & Fat Burning)

अंडी

एका अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने आणि 70 कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी अंडी खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाहीत. याचा फायदा असा होतो की आहाराची मात्रा शरीरात कमी जाते. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या वजनात बदल दिसेल.

पीनट बटर

पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रथिने असतात जे शरीराचे पोषण देखील करतात. हे बटर खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते हे अभ्यासात सिद्ध झाले आहे. तुम्ही रोज सकाळी दोन चमचे पीनट बटर ब्राऊन ब्रेड किंवा ओटमीलसोबत खाऊ शकता.

ओटमील

ओटमीलमध्ये भरपूर फायबर,कार्बोहायड्रेट असतात जे चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. त्यामुळे पोट ही भरते आणि जास्त भूक लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com