
जगात चहाचे तीन प्रकार आहेत. त्यातही प्रमुख दोन प्रकार म्हणजे भारतीय चहा आणि चीनी चहा.
चहा हा भारतीयांचा जीव की प्राण. एखादी ओळखीची व्यक्ती चहा पित नसले, तर तिच्याकडं आश्चर्यानं पाहिलं जातं. मित्रांच्या घोळक्यात एखादा चहा ऐवजी कॉफी मागणारा असतोच. त्याला वेड्यात काढलं जातं. या चहाचा दर्जा कसा असावा?
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावर प्रत्येक चहा प्रेमीचं वेगळं मत असतं. त्यांची ठिकाणं ठरलेली असतात. त्या ठिकाणचाच चहा त्यांना ऊर्जा देतो. पण, हा चहा अर्थात चहा पावडर कुठली चांगली? असाही प्रश्न उपस्थित होतो. जाणून घेऊया या चहाच्या दर्जा विषयी.
- सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय!
आसामचा चहा - आसाम हे भारतातील चहा उत्पादनाचं सर्वांत मोठं केंद्र आहे. तेथे जोरहाटमध्ये टोकलाईमध्ये चहा संशोधन केंद्रही आहे. हे केंद्र सर्वांत मोठे संशोधन केंद्र असल्याचे मानले जाते. आसमचा चहा हा त्याच्या विशिष्ठ स्वादासाठी ओळखला जातो.
दार्जिलिंगचा चहा - दार्जिलिंगमध्ये 1841पासून चहाचे उत्पादन सुरू झाले आहे. दार्जिलिंगचा चहा हा प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात विकला जातो. दार्जिलिंगचा चहा खूपच स्पेशल आहे. तिथल्या चहाचं उत्पादन तिथचं होऊ शकतं. इतर ठिकाणी त्या चहाचं उत्पादन होत नाही.
- काय आहे जॉर्जियन पिझ्झाची कहाणी?
डुआर्स आणि तराई - डुआर्स आणि तराई हा आसाममधीलच सिलिगुडीचा एक भाग आहे. डुआर्सचा चहा खूप स्वच्छ, काळासर आणि तेवढाच ताजा असतो. तर, तराईचा चहा मसालेदार आणि थोडा गोड असतो.
काँगडा - ईशान्येकडील राज्यांबरोबरच हिमाचल प्रदेशमध्येही चहाचं उत्पादन होतं. तेथील काँगडा जिल्हा चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हिरवा आणि काळा चहा ही काँगडा चहाची ओळख आहे.
- पदार्थांना सॉसशिवाय मजाच नाही तर पहा हे साॅसचे प्रकार...
हे माहिती आहे का?
जगात चहाचे तीन प्रकार आहेत. त्यातही प्रमुख दोन प्रकार म्हणजे भारतीय चहा आणि चीनी चहा. यांचा मिळून एक संमिश्र पद्धतीचा चहा सांगितला जातो. यात तीन प्रकारांमधूनच जगभरात चहाचे विविध प्रकार केले जातात. गेल्या काही वर्षांत जगभरात वजन नियंत्रणात ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यासाठी ग्रीन टी किंवा लेमन टीचा पर्याय उत्तम असल्याचं सांगितलं जातं.