#WorldTeaDay : तुम्ही चहाचा इतिहास वाचलाय का?

टीम ई-सकाळ
Sunday, 15 December 2019

चहा मुळात चीनमधला शोध असल्याची इतिहासात नोंद आहे. इ.स. पूर्व काळात चीनी राजा शेन नुंगच्या बागेत चहाचा शोध लागल्याची चीनच्या इतिहासात नोंद आहे.

चहा हा आज, भारतीय जीवनशैलीचा एक भाग बनलाय. चहा शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि संध्याकाळी थकल्यानंतरही अंगात एनर्जी येण्यासाठी पुन्हा चहाचीच आठवण होते. पण, हा चहा भारतात आला कुठून?

Image may contain: drink

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चहा हा इंग्रजांनी भारतात आणला, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण, भारतात प्राचीनकाळापासून चहा अस्तित्वात होता. त्याचं स्वरूप काही ठिकाणी वेगळं होतं. जाणून घेऊ या भारतीय चहा विषयी...

- जंकफूडचे आरोग्यावरील घातक परिणाम 

चहाचा शोध लागला कसा?

चहा मुळात चीनमधला शोध असल्याची इतिहासात नोंद आहे. इ.स. पूर्व काळात चीनी राजा शेन नुंगच्या बागेत चहाचा शोध लागल्याची चीनच्या इतिहासात नोंद आहे. नुंग एकदा बागेत गरम पाणी पीत असताना त्याच्या पेल्यात एक झाडाचे पान पडले. त्यानंतर त्या पाण्याचा रंग बदलला आणि सुंगंध आला. राजानं त्या पाण्याची चव घेतली आणि त्याला ती आवडली, अशा रंजक पद्धतीनं चहाचा शोध लागल्याचं सांगितलं जातं.

Image may contain: one or more people, plant, tree, outdoor and nature

चहा विषयी एक आणखी कथा सांगितली जाते ती म्हणजे, चीनच्या हुनान प्रांतात आठव्या शतकात बौद्ध भिक्कू ध्यान साधना करायचे. त्यासाठी ते जागरण करायचे. ध्यान धारणेसाठी जागरण करताना ते चहाची पाने चघळायचे. पुढं याच पानांचा चहा तयार झाला.

- थीम केकने दिली ओळख

भारतात चहा कसा आला?

इतिहासातील नोंदींनुसार 1824मध्ये मान्यमार (त्यावेळचा बर्मा) आणि आसाममध्ये चहाची रोपं सापडल्याची नोंद आहे. त्यामुळं चहा भारतात होताच. फक्त त्याचं व्यवसायिक उत्पादन सुरू करण्यात इंग्रजांनी मोठा वाटा उचलला आहे. भारतात 1836मध्ये आणि श्रीलंकेत 1867मध्ये इंग्रजांनी चहाचं उत्पादन सुरू केलं. इंग्लंडमधील चहाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं त्यांनी भारतात चहाचं उत्पादन सुरू केलं होतं.

Image may contain: drink and indoor

- ग्रीन सिग्नल - ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन (व्हिडिओ)

भारतात चहाचा खप अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीला अगदी नगण्य होता. पण, आज, भारतच चहाची मोठी बाजारपेठ बनला आहे. भारतात कोपऱ्या कोपऱ्यांवर चहाच्या टपऱ्या पहायला मिळतील. आज, इंग्रज चहाला विसरले आणि भारतीयांनी त्या चहाला आपलंसं केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tea Day Have you read the history of tea