#Happy Birthday Ronaldo : CR7 म्हणजे जणू सळसळता उत्साह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

फुटबॉलपटूंची दिल की धडकन समजला जाणारा क्रिस्टियानो रोनाल्डो याचा आज (बुधवार) वाढदिवस आहे. रोनाल्डो हा पस्तिशीत पदार्पण करीत आहे. पोर्तुगीजचा व्यावसायिक फुटबॉलपटू असलेला रोनोल्डो सध्या जुव्हेंटसकडून खेळतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज फुटबाॅलप्रेमीं त्याला साेशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. 

सातारा ः फुटबाॅलमध्ये 90 मिनिटे नुसते पळायचे नव्हे तर त्याचवेळी डोके लढवयाचेच नाही त्याचा उपयोगही करायचा अन्‌ प्रतिस्पर्ध्याला काही कळायच्या आत चेंडू जाळ्यात ढकलायचा, याला म्हणतात क्रिस्टियानो रोनाल्डो पॅटर्न. फुटबॉलच्या जगतावर साम्राज्य करणारा हा केवळ रोनाल्डो नव्हे तर सळसळत्या उत्साहाचे 35 वर्षांचे कारंजे आहे. हाेय ! क्रिस्टियानो रोनाल्डो आज (बुधवार, ता. 5) वयाच्या 35 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. रोनाल्डोने पाच बॅलन्स डी ऑर आणि चार युरोपियन गोल्डन शूज जिंकले आहेत, जे दोन्ही एक रेकॉर्ड आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने 29 ट्रॉफी जिंकल्या आहेत, ज्यात सहा लीग शीर्षके, पाच युईएफए चॅम्पियन्स लीग, एक युईएफए युरोपियन चॅंपियनशिप आणि एक युईएफए नेशन्स लीगचा समावेश आहे. युईएफए चॅम्पियन्स लीग मधील सर्वाधिक गोल आणि युईएफए युरोपियन चॅंपियनशिप मध्ये सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे.
(संदर्भ - विकीपिडाया)

त्याच्या वाढदिवशी, त्याचे काही नेत्रदीपक गोल पाहूया...  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cristiano Ronaldo Turns 35 Today