अनेकांना घायाळ करणारी ही आहे फिफाची ब्रँड अॅम्बेसिडर

बुधवार, 6 जून 2018

रशियात पार पडणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सध्या सर्वत्र चर्चा असून, यंदाच्या फिफाची ब्रँड अॅम्बेसिडर व्हिक्टोरिया लॉपरेवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धा अवघ्या आठवडय़ांवर येऊन ठेपली आहे. रशियाच्या भूमीवर १४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या फुटबॉलच्या या महायुद्धासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. फुटबॉल हा एक असा खेळ आहे, ज्यावर सहसा पुरुषांचीच मक्तेदारी पाहायला मिळते. मुख्य म्हणजे आजही मुली फुटबॉल हा खेळ आवडतो असं म्हटल्यावर भुवया उंचावणारे काही लोक आपल्याला भेटतात. पण, सध्या याच खेळाच्या निमित्ताने एक सौंदर्यवती चर्चेत आली असून, तिच्या सौंदर्यावर आणि फुटबॉलप्रती असणाऱ्या प्रेमावर सर्वजण फिदा आहेत. रशियात पार पडणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सध्या सर्वत्र चर्चा असून, यंदाच्या फिफाची ब्रँड अॅम्बेसिडर व्हिक्टोरिया लॉपरेवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

व्हिक्टोरियाला फीफाची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर फुटबॉलप्रेमींनी तिचे फोटो आणि माहिती शोधण्याचा धडाकाच लावला आहे. सोशल मीडियावर व्हिक्टोरियाचे एक मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी व्हिक्टोरियाही मग आपले हटके फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. एका स्पोर्ट वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार व्हिक्टोरिया लॉपरेवा जन्म २८ जुलै १९८३ मध्ये रशियात झाला होता. ३४ वर्षीय व्हिक्टोरियाने तिच्या शालेय दिवसांमध्ये अभ्यासासोबतच संगीतकलेचंही शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तिने रोस्टोव्ह स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली.

 victoria lopyreva fifa ambassador

व्हिक्टोरिया लॉपरेवा हे रशियातील ग्लॅमरस दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे.  २००३मध्ये मिस रशियाचा किताबही तिच्या नावावर आहे. मॉडेलिंगह आणि अँकरींगमध्ये रमणारी व्हिक्टोरिया एका टीव्ही शोची होस्टही आहे. शाळेत असल्यापासूनच व्हिक्टोरियाचे व्यक्तीमत्व उठावदार होते. त्यामुळे तिला अनेक ऑफर्सही येत. आपले शिक्षण पूर्ण करताच १९९९ मध्ये ती पहिल्यांदा मॉडेलिंग क्षेत्रात आली. त्यानंतर तिने मिस रशिया सोबतच 'फेस ऑफ द इअर', 'मॉडेल ऑफ डॉन' असे अनेक पुरस्कारही जिंकले. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने बऱ्याच फॅशन आणि सेलिब्रिटी प्रकाशन संस्थांसोबत काम केलं आहे. ज्यामध्ये ‘कॉस्मोपॉलिटन’,’मॅक्झिम’, ‘गाला’ आणि लोफिशिअल या ब्रँडचा समावेश आहे. त्याशिवाय काही रशियन टेलिव्हिजनवर काही फॅशन शोचाही ती भाग होती.

अशा झाली फुटबॉलच्या दुनियेत एंट्री   

सुरूवातीच्या काळात व्हिक्टोरिया ही फुटबॉलची फक्त चाहती होती. मँचेस्टर युनायडेटड हा तिचा अत्यंत आवडता क्लब होता. सन २००७मध्ये तीला रशियाच्या एका टीव्ही शो 'फुटबॉल नाईट'मध्ये अँकरींग करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे रशियाला एक नवी अॅकर मिळाली आणि व्हिक्टोरिया फुटबॉलच्या प्रेमात पडली. रशियातील मीडियामध्ये चर्चा अशी आहे की, व्हिक्टोरियाला वर्ल्ड कप गर्ल बनविण्यात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मोठा हात आहे. एका फुटबॉल कार्यक्रमात अँकरींग करताना पुतीन यांनी व्हिक्टोरियाला पाहिले होते. तेव्हापासून तिला त्यांनी तिला लक्षात ठेवलं होतं. जेव्हा वर्ल्ड कप गर्लसाठी शोध सुरू झाला तेव्हा, व्हिक्टोरियाचे नाव पुढे करण्यात आले. व्हिक्टोरिया ही पुतीन यांची कट्टर समर्थक आहे. निवडणूक काळात तिने पुतीन यांचा प्रचार केला होता. 

व्हिक्टोरिया या विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. ज्याच्या माध्यमातून ती रशियन संस्कृतीचा प्रचार करणार आहे. रशियाची ही सौंदर्यवती सोशल मीडिया आणि इंटरनेटवरही जोरदार अॅक्टीव्ह असते. इंन्स्टाग्रामवर तिचे एक मिलियनपेक्षाही अधिक चाहते आहेत. ही संख्या अनेक नामवंत क्लबच्या चाहत्यांपेक्षाही अधिक आहे. फीफा वर्ल्डकपदरम्यान व्हिक्टोरिया लोकांना हेल्दी लाईफ स्टाईलबाबत,एचआयव्ही आणि वर्णभेद या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करताना दिसेन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victoria Lopyreva is FIFA's World Cup Ambassador