‘इको बाप्पा’ बनविण्यात रमली मुले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 August 2019

पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शाळांमध्ये इको बाप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुणे - पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शाळांमध्ये इको बाप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केट सिटी, संडे सायन्स स्कूल, क्‍लारा ग्लोबल स्कूल, एडीफाय इंटरनॅशनल स्कूल आणि अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स हे आहेत. 

पुण्यातील स्ट्रोक्‍स फाउंडेशनचे चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी आणि टीमने मुलांना गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर सेंट्रल मॉलच्या मार्केटिंग विभागातील श्‍वेता वर्मा व अरुण रामानन यांनी सहकार्य केले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या उपक्रमातून ती होत आहे. त्यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.
- यशोधन भिडे, संचालक, अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स 

प्रदूषणामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. अशा उपक्रमांतून भावी पिढीला पर्यावरणपूरक सणांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यामुळे ‘सकाळ’च्या अशा उपक्रमांचे स्वागतच आमच्या शाळेने केले आहे.
- गौतम बुधरानी, अध्यक्ष, एडीफाय इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी 

‘सकाळ’ नेहमीच उपक्रमांतून नवीन पिढीला मार्गदर्शन करत असतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना मुलांमध्ये रुजविली पाहिजे.
- सारिका बाबर, संचालक, क्‍लारा ग्लोबल स्कूल 

इको फ्रेंडली गणपती बनविण्याच्या कार्यशाळेमध्ये मुले व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ‘सकाळ’मुळे अशा या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. 
- अरुण अरोरा, सेंटर डायरेक्‍टर, फिनिक्‍स मार्केट सिटी, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco Bappa Making by Child Environment Ganpati Murti