Ganesh Chaturthi 2022 : आता बाप्पाचंही आधार कार्ड! स्कॅन केल्याशिवाय भक्तांना एन्ट्री नाहीच

बाप्पाचं आधार कार्ड स्कॅन करून भक्तांना दर्शनासाठी एन्ट्री देण्याची अनोखी कल्पना
Ganesh Chaturthi 2022 :  Adhar card of lord Ganesha
Ganesh Chaturthi 2022 : Adhar card of lord Ganeshaesakal

गणोशोत्सवात अनेक ठिकाणी तुम्हाला सजावटीच्या थिम्स बघायला मिळतील. सार्वजनिक गणेशपुजेसाठी ठिकठिकाणी जनतेला विशिष्ट संदेश पोहोचवणाऱ्या थिम्स असतात. अशीच एक थिम जमशेदपुरच्या एका गणेशमंडळाने तयार केलीय. ज्याची सर्वत्र चर्चा चाललीय. बाप्पाचा आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करताच बाप्पाचा सुरेख असा फोटो दिसतो. ज्याला बघून लोक उत्साहित होत आहेत. या आगळ्यावेगळ्या मंडपाची सर्वत्र भारी चर्चा चाललीय. (Ganesh Chaturthi 2022 : Adhar card of lord Ganesha)

जमशेदपुरच्या साकची बाजारातील एक गणेश मंडपाने लोकांचं लक्ष वेधून घेतोय. या मंडपावर आधारकार्डचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे आधार कार्ड दुसऱ्या कोणाचे नसून बाप्पाचे आहे. त्यांच्या आधार कार्डमध्ये त्यांचा आधार कार्ड नंबरही आहे. या आधार कार्डला स्कॅन करताच बाप्पाचा फोटो दिसतो. एवढंच नाही आधार कार्डमध्ये बाप्पाचा कैलास पर्वतावरचा पताही देण्यात आलाय.

बाप्पाच्या आधार कार्डची कल्पना कशी सुचली ?

या गणेश मंडळाचे संस्थापक एकदा कोलकात्याला गेले होते. तिथे त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित अनेक वेगवेगळे मंडप बघितले. त्या मंडपांचा संबंध सामान्य लोकांशी होता. त्यातून जनतेस महत्वपूर्ण संदेश दिल्या गेला. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी हा आधार कार्ड मंडप उभारला. ज्यांचे अजूनही आधार कार्ड नाहीत त्यांच्यासाठी या मंडपातून मोलाचा संदेश देण्यात आलाय.

Ganesh Chaturthi 2022 :  Adhar card of lord Ganesha
Ganesh Utsav 2022: यंदा व्हॉट्सॲपवर ठेवा बाप्पाचा भारी DP

दैनंदिन जीवनातील अनेक काम आधारकार्डशिवाय होऊच शकत नाही. आधार कार्ड हे सगळ्यांसाठीच किती महत्वाचं आहे हा मोलाचा संदेश या मंडपातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com