esakal | 'ती'चं कौशल्य! विरघळलेल्या मातीतून पुन्हा घडवली गणेश मुर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

'ती'चं कौशल्य! विरघळलेल्या मातीतून पुन्हा  घडवली गणेश मुर्ती

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात ही मूर्ती विरघळली होती. मात्र त्याच मातीतून पुन्हा नवीन तशीच मूर्ती घडवण्यात आली आहे.

'ती'चं कौशल्य! विरघळलेल्या मातीतून पुन्हा घडवली गणेश मुर्ती

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगलीतील विजयंत मंडळाच्या मातीच्या गणपतीची यंदा पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात ही मूर्ती विरघळली होती. मात्र त्याच मातीतून पुन्हा नवीन तशीच मूर्ती घडवण्यात आली आहे. सांगलीचे दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांनी सन १९७२ मध्ये विजयंत मंडळाची स्थापना केली.

सांगलीतील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार रघुनाथ अनंत सत्तीकर यांनी शहराच्या जवळूनच वाहणाऱ्या कृष्णा नदीतील गाळ माती आणि शाडूपासून ही मुर्ती बनवली. दरवर्षी गणेशोत्सवात ही श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते. नवव्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढली जाते. पण ही श्रींची मुर्ती परत सत्तीकर यांचे जागेत ठेवली जाते. वर्षभर असंख्य भाविक दैनंदिन या मूर्तिचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. विजयंत मंडळाचा गणेश उत्सव गेली पन्नास वर्षे सांगली आणि पंचक्रोशीतील गणेशभक्त नागरिकांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. मंडळाचे कार्यक्रम आणि नवव्या दिवशीची मिरवणूक नेहमीच आकर्षण राहिले आहे. मिरवणूक पाहण्यास तर आजूबाजूच्या गावातील लोकही येतात.

हेही वाचा: दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

दोन वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये सांगली शहरात आलेल्या कृष्णेच्या महापुरात ही मुर्ती पाण्यात विरघळली. पण माती जागेवर तशीच राहिली. मूळ मूर्ती ज्या मातीपासून आणि शाडूपासून बनवली त्याचाच उपयोग करून रघुनाथ सत्तीकर यांच्या पुतणी सौ. वर्षा शिवराम सोमण (सतीकर) यांनी पुन्हा हुबेहूब तशीच आणि तेवढ्याच उंचीची सुबक रेखीव मूर्ती बनवली. त्या म्हणाल्या, गेली अनेक वर्षे आम्ही गणपती मूर्ती बनवतो. विजयंत मंडळाच्या मूर्तीची मला माहिती होती. तसेच त्याचे फोटोही होते. त्याच्या आधारे पुन्हा तशीच मूर्ती शादू, गाळ माती आणि पाण्याचे रंग वापरून बनवली आहे.

विजयंत मंडळाच्या या गणेशमुर्तीची मारुती चौकात युवा नेते पृथ्वीराज पवार यांचे हस्ते यंदा प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे यंदाचे 50वे अर्थातच सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या अर्धशतकाच्या कारकिर्दीत विजयंत मंडळाने अनेक नामांकित व दिग्गज कलाकारांना सांगलीत मारुती चौकात तसेच शेजारच्या तरुण भारत स्टेडियममध्ये आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त करुन दिली.

हेही वाचा: गणपती पाठोपाठ ज्येष्ठा गौरींचे वाजत गाजत आगमन

अनुप जलोटा, तीजनबाई, मेवाबाई सफेरा, तेरीताली नृत्य, येसावकर पार्टी, प्रल्हाद शिंदे, सुरेखा पुणेकर, माया जाधव, छाया माया खुटेगावकर, उषा मंगेशकर, दीपाली सय्यद, स्वप्निल बांदोडकर यांच्यासारख्या अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली. श्रींची भव्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, कार्यक्रम ही मंडळाची खाशीयत. गेल्या तीन वर्षात आलेल्या महापूर व कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन साधेपणाने उत्सव साजरा करुन प्रशासनाला सहकार्य करीत आहोत, असे पृथ्वीराज पवार म्हणाले.

loading image
go to top