पालिका गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन

कोरोना निर्बंधामुळे श्री गणेशाचे सध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले
jalgaon
jalgaonsakal

एरंडोल: येथील पालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पालिका कर्मचारी गणेश मंडळातर्फे दर वर्षी पाचव्या दिवशी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले जाते. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे कर्मचाऱ्यांनी साध्या पद्धतीने विसर्जन केले. या वेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, विक्रम घुगे, सुरेश दाभाडे, आर. के. पाटील, योगेश सुकटे, लक्ष्मण पाटील, विकास पंचबुद्धे, संदीप शिंपी, अनिल महाजन, प्रकाश सूर्यवंशी, दीपक गोसावी, संदीप सातपुते यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

पालिकेने या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा याअंतर्गत आणि कोरोनाचे संकट टाळण्यासाठी शहरात चार ठिकाणी मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. अनंत चतुर्दशीला पालिकेतर्फे शहरातील मरीमाता चौक, म्हसावद नाका, कासोदा दरवाजा आणि पिंप्री रस्त्यावरील जुने पद्मालय तलाव या चार ठिकाणी मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

निर्माल्य संकलन केंद्रात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून पालिकेतर्फे खतनिर्मिती करण्यात येणार आहे. तसेच मूर्ती संकलन केंद्रातील सर्व गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी गणपतीच्या मूर्ती आणि निर्माल्य पालिकेच्या संकलनस्थळी जमा करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com