esakal | 'बाप्पा कोरोनाचं संकट लवकर दूर कर'!
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

'बाप्पा कोरोनाचं संकट लवकर दूर कर'!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई: कोरोनाची दूसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले होते. त्यावर कुठे मात केली नाहीतर आता तिसऱ्या लाटेचे संकेतही देण्यात आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्नही केले आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशावेळी शासनाकडून सातत्यानं काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आता सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्सवाच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येताना दिसत आहे. वास्तविक प्रशासनानं काही नियमावली याबाबत प्रसिद्ध केली आहे. मुंबईच्या महापौर यांनीही भाविकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील भाविकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा धोका टाळता येणार नाही. अशावेळी आपणच आपली काळजी घेतल्यास त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. आता सर्वांनी खबरदारी घ्यावी. गेल्या दीड वर्षांपासून आपण एका मोठ्या संकटातून जात आहोत. त्याचा सामनाही मोठ्या धैर्यानं सर्वांनी केला आहे. मात्र तरीही अजून तो आजार पूर्णपणे गेलेला नाही. त्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन उत्सव साजरा करावा. असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. प्रशासनानं उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही दिल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहनही सरकारच्या वतीनं करण्यात आले आहे.

भाविकांनी लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर त्याच्यापुढे आपलं एक गाऱ्हाणं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दिलासा मिळाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले आहेत. त्यानं आता बाप्पाला गेल्या वर्षी केली तिच विनवणी यंदाही केली आहे. बाप्पा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर करावं. अशी विनवणी केली आहे. सोशल मीडियावरही यासंबंधी काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याचे काय आहे, गेल्या काही दिवसांपासून उत्सव साजरा करण्यावर येणारी बंधने लक्षात घेता मर्यादीत स्वरुपात उत्सव साजरा करावा लागत आहे. भाविकांनी लाडक्या गणेशाकडे हे संकट दूर करुन आनंदात उत्सव साजरा करण्यासाठी गळ घातली आहे.

हेही वाचा: इकोफ्रेंडली बाप्पा संकल्पनेला हातभार! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

हेही वाचा: माझा बाप्पा रुबाबदार...!

प्रशासनानं उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रसार होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुचनाही आरोग्य खात्याला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपाययोजनाही करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

loading image
go to top