अमेरिकेत शार्लट महाराष्ट्र मंडळाने दिली मरगळलेल्या मनांना उभारी

मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
Monday, 24 August 2020

दर वर्षी गणरायांचं आगमन वाजतगाजत धूमधडाक्यात होतं. मंडळांच्या कार्यक्रमांना रंग चढलेला असतो. त्यानिमित्ताने मित्रमंडळीच्या गाठीभेटी होतात. उत्साहाला उधाण आलेलं असतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर यावेळी चित्र वेगळं आहे पण निराशाजनक नक्कीच नाही. जग कोविड१९ ला तोंड देत असलं तरी गणरायांच्या आगमनाने मरगळलेल्या मनांना उभारी आली आहे. मनावरचं सावट आपोआप किंचित बाजूला झालं आहे.

दर वर्षी गणरायांचं आगमन वाजतगाजत धूमधडाक्यात होतं. मंडळांच्या कार्यक्रमांना रंग चढलेला असतो. त्यानिमित्ताने मित्रमंडळीच्या गाठीभेटी होतात. उत्साहाला उधाण आलेलं असतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर यावेळी चित्र वेगळं आहे पण निराशाजनक नक्कीच नाही. जग कोविड१९ ला तोंड देत असलं तरी गणरायांच्या आगमनाने मरगळलेल्या मनांना उभारी आली आहे. मनावरचं सावट आपोआप किंचित बाजूला झालं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी घरोघरी गणपतीच्या दर्शनासाठी आमंत्रण नाहीत, हसतखेळत होणार्याक आरत्यांचा आवाज दुमदुमणार नाही हे खरं असलं तरी अडचणीतून मार्ग काढला जातोच. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना राज्यातल्या शार्लट महाराष्ट्र मंडळानेही भारतातून कलाकारांना आमंत्रित करण्याची परंपरा अखंड राखली आहे; फरक एवढाच आहे की हे कलावंत प्रत्यक्ष इथे न येताही शार्लटकराचं मनोरंजन करणार आहेत. भाडिपा फेम मंदार भिडे आम्हाला हसवायला सज्ज झाले आहेत तर हृषिकेश रानडेंच्या सुमधुर संगीताची मैफिल लवकरच शार्लटकर अनुभवणार आहेत. स्थानिक कलाकारांचं गुणदर्शन, मुलांसाठी गणरायाचं चित्र रेखाटन, गणेशमूर्ती कार्यशाळा, भजन, गीतमेळा आणि ढोलताशे असे सारेच कार्यक्रम नेहमीप्रमाणेच होणार आहेत फक्त त्याचं स्वरुप बदललं आहे. शार्लटकर हा सगळा आनंद अनुभवणार आहेत online! Facebook live, Youtube live या समाजमाध्यमांतून शार्लटकरांच्या गणेशत्सवाला सुरुवात झाली आहे.

एरवी महाप्रसादाला भाविकांची गर्दी देवळात लोटते. या वेळेला त्याचं स्वरूप मर्यादित आहे. मिळालेल्या निधीतला बराचसा भाग गावातल्या सामाजिक संस्थांना दिला जाईल. सामाजिक ऋणातून काही अंशी उतराई होण्याच्या मंडळाच्या प्रयत्नाला शार्लट महाराष्ट्र मंडळातील सभासदांनी मदतीचा हात पुढे करत दाद दिली आहे.

शार्लट महाराष्ट्र मंडाळाचे अध्यक्ष - राहुल गरड, उपाध्यक्ष - महेश भोर, विश्वस्त - अमित कोलूरवार, विनोद हावळ, अनिरुद्ध वैशंपायन, खजिनदार - अदिती बिद्रे, सचिव - मिलिंद गायकवाड, कार्यकारिणी - कविता महाजन, संदीप पवार, राहुल बोबडे, संतोष पाटील, मोहना जोगळेकर. गणेशोत्सवाचे अध्यक्ष: पांडुरंग नाईक, सहाध्यक्ष: अनिरुद्धध वैशंपायन, निधी नियोजन: सचिन ढवळीकर.

- मोहना प्रभुदेसाई जोगळेकर mohanajoglekar@gmail.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra mandal ganapati festival charlotte north carolina