पूर्व विभाग मध्यवर्ती गणेश मूर्तीचे पंचामृतात विसर्जन; मूर्ती संकलन केंद्रांवर गर्दी 

Purv Bhag Madhyavarti
Purv Bhag Madhyavarti

सोलापूर : अनंत चतुर्दर्शीनिमित्त पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अंतर्गत पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मानाच्या गणपतीची विधीवत पालखी पूजा व आरती करण्यात आली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत साधेपणाने व आदर्श असा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा सार्वजनिक विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या. गणेशाची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा करून मूर्तीला दूध पंचामृताने स्नान घालून जागेवरच कृत्रिमरीत्या सजविलेल्या दूध व जलपात्रात गणरायाची मूर्ती विसर्जित करण्यात आली. शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करून "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या निनादात लाडक्‍या श्री गजाननाला निरोप देण्यात आला. 

या वेळी महामंडळाचे विश्वस्त माजी महापौर जनार्दन कारमपुरी व पक्षनेता श्रीनिवास करली, डॉ. सूरज कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विद्यापीठ सदस्य मोहन डांगरे, नगरसेवक नागेश वल्याळ, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी, समाजाचे ज्येष्ठ नेते गणेश पेनगोंडा, अविनाश बोमड्याल आदींसह कामगार नेते विष्णू कारमपुरी, उमेश मामड्याल, पुरुषोत्तम पोबत्ती, दत्तात्रय कारमपुरी, युवक संघटना अध्यक्ष राकेश पुंजाल, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, ऍड. श्रीनिवास कटकूर, महांकाळ येलदी, महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गड्डम, सूर्यकांत जिंदम, महेश धारा, अंबादास अमृतम, तुकेश भैरी, अंबादास लोकुर्ते, श्रीनिवास पुरुड, शेखर कटकम, सागर मामड्याल, मंडळाचे पदाधिकारी व गणेशभक्त आदी उपस्थित होते. 

पूर्वभागातील घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी महापालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहे. या केंद्रांवर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी मूर्तींचे विधिवत पूजन करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द केल्या. यंदा मिरवणुका नाहीत, ढोलताशे नाहीत तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र दिसून आला. घरगुती गणेशमूर्तींचे कुटुंबासह मूर्ती संकलन केंद्रांकडे "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर'चा निनाद मात्र परिसर दुमदुमून टाकला होता. 

मूर्ती संकलन केंद्रांवर सकाळच्या वेळी मूर्ती संकलनाचे प्रमाण कमी होते, मात्र दुपारनंतर सायंकाळपर्यंत मूर्ती संकलन केंद्रांसमोर गर्दी दिसून आली. पूर्वभागासह जुने विडी घरकुल परिसरातही मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com