१२० वर्षांची परंपरा असलेल्या माजलगावच्या टेंबे गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना

कमलेश जाब्रस 
Saturday, 29 August 2020

माजलगाव - कोरोनामुळे दर्शनासाठी नियमावली 

माजलगाव : तब्बल १२० वर्षांची परंपरा असलेल्या येथील पाचदिवसीय टेंबे गणपतीची शनिवारी (ता. २९) मोठ्या उत्साहात एकादशीच्या दिवशी स्थापना करण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

येथील टेंबे गणपती हा पाचदिवसीय असून, भाद्रपद एकादशीच्या दिवशी स्थापना होते. पाच दिवसांनी पौर्णिमेला, प्रतिपदेला तिथीनुसार विसर्जन होते. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने परंतु उत्साहात टेंबे गणेश मंडळाच्या सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या जागेत भव्य सभामंडपाची उभारणी करून सायंकाळी विधिवत स्थापना करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मंडळाकडून इतिहासात प्रथमच सामाजिक देखावे, मिरवणूक होणार नाही; परंतु रोज आरतीसाठी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दर्शन व आरती सोशल मीडियावर लाईव्ह असणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी आहे नियमावली..! 
१. श्री मंडपात मास्क शिवाय प्रवेश करू नये.
२. थर्मल स्क्रिनिंग नंतरच प्रवेश मिळेल.
३. मंडपात प्रवेश केल्यास शारीरीक अंतराचे पालन करावे.
४. प्रवेशाच्या वेळेस उपलब्ध असलेल्या व्यवस्थे प्रमाणे निर्जंतूकीकरण करावे.
५. दर्शनास येताना हार, फुले, दूर्वा अथवा प्रसादासारख्या (अनारसे, पेढे, मोदक) वस्तू आणू नयेत.
६. अशा वस्तू मंडळाकडून कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणर आहेत.
७. कोरोना प्रादूर्भावामुळे शालेय साहित्य स्विकारले जाणार नाही.
८. आरतीचे प्रक्षेपण यु - ट्युब, फेसबुक वर सायं. ७ ते ८ या वेळेत करण्यात येईल.
youtubeTEMBE GANESH, www.facebook.com/tembeganesh

 

शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली. कसल्याही प्रकारची मिरवणूक न काढता ही स्थापना करण्यात आली आहे. भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळास सहकार्य करावे. 
- अनंत जोशी, अध्यक्ष, टेंबे गणेश मंडळ. 
 

(संपादन - प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Majalgaon Ganesh darshan Establishment Tembe Ganapati