नवसाला पावणारा ‘यवतमाळचा राजा'; विसर्जन मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू 

Procession of the 'King of Yavatmal' is the center of attraction
Procession of the 'King of Yavatmal' is the center of attraction

यवतमाळ : नवसाला पावणारे गणपती मंदिर अनेक ठिकाणी आहेत. मात्र, सार्वजनिक उत्सव मंडळापैकी अत्यंत दुर्मीळ प्रसंग आहेत. यात यवतमाळच्या राजाचे नाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांच्या मनात यवतमाळचा राजाचे स्थान आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. 

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. सन इ. स. १९६४ या स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेला अन्नदान, वस्त्रदान, सामाजिक जाणीवांचा संकल्प अविरत सुरू आहे. 

सुरुवातीला काही भक्तांनी तसेच व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन त्यांना फळ मिळाले. त्यामुळे या गणेशावर व्यापारी वर्गांची विशेष श्रद्धा आहे. ‘श्री’ची स्थापना झाल्यापासून अनेकांना त्यांची प्रचीती आल्याची आख्यायिका आहे. येथूनच नवसाला पावणारा ‘यवतमाळचा राजा’ म्हणून श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली. 

समाजातील वंचित लोकांना न्याय मिळवून देताना देशात कुठेही नैसर्गिक संकट आले की संकटमोचन म्हणून मदतीला धावून जाण्याची एक संस्कृती गणपती मंडळाने टिकवून ठेवली आहे. त्यामुळेच यवतमाळचा राजा गणेश मंडळ जिल्हतील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. 

स्थापना, विसर्जन मिरवणूक 

शहरात यवतमाळचा राजा हे नावाजलेले व महत्त्वपूर्ण मंडळ आहे. दरवर्षी या मंडळांची स्थापना व विसर्जन मिरवणूक भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याशिवाय मोठमोठे देखावे पाहण्यासाठी व दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक येतात. मिरवणुकीत राज्यातील कानकोपऱ्यतील वाद्य पथक, झॉकी, देखावे सहभागी होत असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. 

सामाजिक बांधिलकी 

अनेक संकटांच्या वेळी मंडळांने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. लॉकडाउनच्या काळात गरजवंतांना मंडळाने फूड पॅकेट्स, औषधांची फवारणी, पाणी वाटप असे महत्त्वाचे कार्य केले आहे. आता गणेशोत्सवातही मंडळाने शासकीय नियमानुसार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चार फुटांपर्यंत मूर्ती असावी, असे सरकारचे आदेश आहेत. मात्र, या मंडळांनी यापुढे जाऊन मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ स्थापनेची छोटी मूर्ती बसवून मूर्तीच्या ठिकाणी ‘थ्री डी इफ्केट’नुसार मूर्ती ठेवण्याचा विचार मंडळाचा आहे. 

नियमांचे पालन  करण्याचा संकल्प
कोरोनामुळे यंदा सरकारने नियम निश्‍चित केले आहेत. त्याअनुषंगाने मंडळानेही नियमांचे पालन करूनच निर्विघ्नपणे हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. मंडळांचे बे ५८ वे वर्षे आहे. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही आमची पिढी जपत आहे. काळानुरूप मोठे बदल झाले आहे. पूर्वी काही प्रमाणात आम्ही मदत करीत होता. आता ही संख्या वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने श्रींची स्थापना करून यंदा गर्दी टाळण्यासाठी अन्नदान न करता फूट पॅकेट्सचे वितरण रोज गरजवंतांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन केले जाईल. याशिवाय अजूनही जनजागृती तसेच सामाजिक उपक्रमाचे व्रत आम्ही घेतले आहे. 
- मनोज पसारी, 
अध्यक्ष, यवतमाळचा राजा गणेश मंडळ, यवतमाळ. 

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com