सोशल डिस्टिन्सिंग धाब्यावर; नियम तोडून गणेश दर्शनासाठी नागरिक रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

गणेश मंडळे प्रशासनाच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी न करताना गणेशोत्सव साजरा करीत आहेत. परंतु गौराईंच्या विसर्जनानंतर लोक गणपती पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. 

पुणे - कोरोनामुळे सर्वच मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजर करीत असतानाच नागरिक मात्र "सोशल डिस्टिन्सिंग'चे नियम धाब्यावर बसवून गणेश दर्शनासाठी रस्त्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरही ताण येण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केले आहे. गणेश मंडळे प्रशासनाच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी न करताना गणेशोत्सव साजरा करीत आहेत. परंतु गौराईंच्या विसर्जनानंतर लोक गणपती पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लहान मुलांना घेऊन रस्त्यावर घोळक्‍याने नागरिक फिरताना दिसू लागले आहेत. गणेश मंडळांच्या मूर्ती मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपताना, दर्शन घेताना शारीरिक अंतर ठेवले जात नसल्याचे चित्र आज रात्री होते. गणेश मंडळांनी भाविकांना मुख्य मंडपात वा मंदिरात प्रवेश देणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. परंतु नागरिक मंडपाबाहेर थांबून दर्शन घेत आहेत. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना समजावण्याची वेळ येत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे याबाबत म्हणाल्या, ""कोरोना प्रादुर्भावाचा विचार करून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिक बाहेर पडत असतील, तर ते कोरोनाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरेल. गर्दी टाळण्याबाबत गणेश मंडळांना सूचना केल्या जात आहे.'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणपतीचे दर्शन नागरिकांना घरीच घेता यावे यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्याचा वापर करून दर्शन घ्यावे. लहान मुले, वृद्ध नागरिक यांनी बाहेर पडणे टाळावे. अनावश्‍यक गर्दी केल्यास आजाराचा धोका आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबांनी याचा विचार करावा. 
- स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens on the streets for Ganesh darshan by breaking the rules