समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

‘सकाळ’ विघ्नहर्ता उपक्रम हा अर्थ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. विघ्ने दूर करण्यासाठी आपल्यामध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये श्रीगणेशाची परिपूर्ण भावना जागविण्याची ही आहे अभूतपूर्व संधी.

‘सकाळ’चा उपक्रम; समाजाच्या शक्तीला आवाहन
श्रीगणेश म्हणजे मांगल्य आणि विघ्नहर्ता. अवघे विश्व अस्वस्थ हेलकावत असताना गणरायाच्या आगमनाने मांगल्य तर आले; आता वेळ आहे विघ्ने दूर करण्याची. त्यासाठी गणेशाचा अर्थ स्वतःमध्ये सामावून घेण्याची. ‘सकाळ’ विघ्नहर्ता उपक्रम हा अर्थ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. विघ्ने दूर करण्यासाठी आपल्यामध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये श्रीगणेशाची परिपूर्ण भावना जागविण्याची ही आहे अभूतपूर्व संधी.

विघ्नहर्ता मंच
श्रीगणेश संकटांचे हरण करतात, अशी आपली श्रद्धा. आजच्या अभूतपूर्व संकटाच्या काळात श्रद्धेच्या पुढे एक पाऊल टाकले पाहिजे आणि समाजावरील विघ्नाचे हरण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. श्रीगणेशाच्या विघ्नहर्ता रूपाची परिपूर्ण भावना आपल्यामध्ये जागवली पाहिजे. ‘सकाळ’ विघ्नहर्ता उपक्रम त्यासाठीचा व्यापक मंच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे व्हा सहभागी...
‘विघ्नहर्ता’ मंच ही आहे संधी समाजातील प्रश्‍न सोडविण्याची. ‘विघ्नहर्ता’ मंचावर आपण नोकरी-शिक्षण, शारीरिक-मानसिक आरोग्य, शेती, व्यवसाय, ज्येष्ठ नागरिक, स्वच्छता, कायदा अशा वेगवेगळ्या विषयांवर एकमेकांची मदत करू शकता. विघ्नहर्ता मंचावर समाजातील अडल्या-नडलेल्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यातील विघ्नेही मांडता येतील. या उपक्रमात सहभागी होत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना अशा प्रश्नांवर उत्तरे शोधतील आणि संबंधित व्यक्तीच्या विघ्नाचे हरण करतील. अशा प्रकारे संकटांवर परस्परांच्या मदतीने मात करण्याची समाजाची स्वाभाविक शक्ती जागविण्याचा उपक्रमाचा हेतू आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मला मदत  करायची आहे...
विघ्नहर्ता वेबसाइटवर लॉगीन करावे. 
वेबपेजवरील फॉर्ममध्ये आपली माहिती भरा.
आपण समाजासाठी काय करू इच्छिता हे सविस्तर लिहा.
आपल्या माहितीची खातरजमा करून ती विघ्नहर्ता उपक्रमाच्या वेबपेजवर प्रसिद्ध होईल.
ज्यांना आपल्याकडून मदत हवी आहे ते आपल्याशी संपर्क साधू शकतील.  
याशिवाय
मदतीची गरज असलेल्यांची माहिती वाचावी.
सोबत दिलेल्या HELP बटनावर क्लिक करून आपण ज्या व्यक्तीला मदत करू इच्छिता, त्याला उत्तर द्यावे.
‘सकाळ’तर्फे ही माहिती तपासली जाईल
आपल्या मदतीची गरज असलेल्याकडे आपली माहिती खात्री करून पोचवली जाईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या माहितीचा कसा वापर होईल?
    आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल.
    आपण करू इच्छित असलेल्या मदतीबद्दल माहिती वेबसाइटवर दिसेल.
    आपल्याकडून मदत इच्छिणाऱ्यांची माहिती आपल्यापर्यंत पोचवली जाईल. 

Image may contain: text that says "विघ्नहर्ता VIGHNAHARTA कसे सहभागी व्हाल? सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करा किंवा सोबतच्या लिंकला भेट द्या. (https://vighnaharta.esakal.com अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल: ९८८१५९८८१५ ई-मेल: vighnaharta@esakal.com vighnaharta@"

मदत कशा स्वरूपाची असेल?
मदत वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते.
वेबपेजवर मांडलेल्या अडचणींनुसार मदतीचे स्वरूप ठरू शकते.
सल्ला, मार्गदर्शन, उपयोगी वस्तू किंवा थेट आर्थिक मदत इत्यादी स्वरूपाची असू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganeshotsav 2020 sakal vighnaharta activities