३१ वर्षात ४५२ आकर्षक गणेश मुर्तीचे संकलन- ॲड. दिलीप ठाकूर 

file photo
file photo

नांदेड : येथील दिलीप ठाकूर यांच्या या अनोख्या संग्रहात भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरातील मुर्तीच्या प्रतिकृती सोबतच नेपाळ, भूतान, थायलँड, श्रीलंका यासारख्या देशातील दुर्मिळ गणेश मूर्ती आहेत. विविध वाद्य वाजवणारे गणपती, सुटाबुटातील गणपती, मोबाईलधारक गणपती, लॅपटॉप चालवणारा गणपती, फोन करणारा गणपती, घसरगुंडी खेळणारा गणपती, लहान उंदिराला पायावर घेऊन झोके देणारा गणपती, बाहुल्यांचा गणपती, धान्यापासून बनवलेला गणपती, रुचकीच्या झाडापासून बनविलेला गणपती, बसलेला गणपती, उभा असलेला गणपती, झोपलेला गणपती, गल्ल्यावर बसलेला गणपती, दो-यापासून बनवलेला गणपती, गणेश मुखी दुर्मिळ रुद्राक्ष, नारळात कोरलेला गणपतीची अशी विविध रूपे पाहण्यासाठी गणेशोत्सवात दरवर्षी अनेक भाविक येत असतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रदर्शन भरवण्यात आले नाही. 

आपल्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत दिलीप ठाकूर यांनी हृदयस्पर्शी माहिती दिली. १९८९ पर्यंत ठाकूर हे अंधश्रद्धा चळवळीचे श्याम मानव व श्री. दाभोळकर यांचे अनुयायी होते. कट्टर गणेशभक्त म्हणून त्यांची ओळख आहे. एक वर्षाचा नवस असतांनाही तब्बल ३१ वर्षापासून नांदेडच्या एसटी कर्मचारी गणेश मंडळाला ठाकूर हे आवर्जून गणेशमूर्ती देत असतात. दरवर्षी वेगवेगळी मूर्ती द्यावी या उद्देशाने त्यांनी मूर्तिकाराला दाखवण्यासाठी जमा केलेल्या छोट्या मुर्त्यांचे आता विशाल संग्रहात रूपांतर झाले आहे. ठाकूर यांची गणेश भक्ती माहीत असल्यामुळे अनेक परिचित त्यांना आढळलेली नाविन्यपुर्ण  मूर्ती आणून देतात. 

शहरातील गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गणेश उत्सव 

सत्य गणपती येथे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली १५१ पदयात्रा संपन्न झाल्या आहेत. नांदेड शहरातील गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गणेश उत्सव काळात गणेश दर्शन स्पर्धाचे आयोजन देखील दिलीप ठाकूर करतात. देशातील बहुसंख्य गणेश मंदिरांचे त्यांनी दर्शन घेतलेले आहे. त्यांच्या संग्रहातील एक मूर्ती अष्टविनायकासह अनेक नामवंत मंदिरातील मुख्य मूर्तीला स्पर्श करून आणलेली आहे. या मूर्तीसमोर दिलीप ठाकूर दररोज गणपती स्तोत्राचे पठण करून पूजा करतात. कोरोना संक्रमण संपल्यानंतर हा विलोभनीय संग्रह पाहण्यासाठी गणेश भक्तांना संधी देण्यात येईल असे श्री. ठाकूर यांनी सांगितले आहे.

(यामधून कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेचा प्रचार करण्याचा आमचा हेतु नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com