Ganeshotsav 2022 : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिसांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022 akola traffic police

Ganeshotsav 2022 : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिसांची नजर

अकोला : दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने अकोला शहरात गणेश चतुर्थीला श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. अकोला शहरातील विविध भागासह अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. ही गर्दी पाहता निर्विघ्न गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

काेराेना विषाणू संसर्गामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करताना अनेक अटी व नियमांची बंधणे घालण्यात आली होती. त्यामुळे उत्सवांवर प्रचंड मर्यादा आल्या हाेत्या. दाेन वर्षे जाहीर कार्यक्रमांच्या संख्यांवर मर्यादित हाेती. यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने बुधवारी गणेश चतुर्थीला भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

असा होता बंदोबस्त

गणेशोत्सवाची सुरुवात बुधवारपासून झाली. गणेश मूर्तीची शहरातील विविध भागात स्थापना करताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत फिक्स पॉईंटवर बंदाेबस्त होता. यात जुने शहरात २५, काेतवाली १५, रामदासपेठ १६, सिव्हिल लाईन्स ११, एमआयडीसी चार, खदान १३ आणि अकाेट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीत १३ ठिकाणीचा बंदोबस्त होता.

वाहतूक कोंडी सोडविताना दमछाक

अकोला क्रिकेट क्लबवर मुख्य गणेश बाजार होता. याशिवाय जठारपेठ, तुकाराम हॉस्पिटल चौक, जयहिंद चौक, कौलखेड चौकातही गणेश मूर्ती विक्रीची तुकाने थाडण्यात आली होती. या चौकांमध्ये व अकोला क्रिकेट क्बलकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. वाहतूक पोलिसांनी आधीच अकोला क्रिकेट क्लबच्या बाजूने जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता.

उड्डाणपूल झाला वाहनतळ

अकोला क्रिकेट क्लबवरील गणेश बाजारात मूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांचे वाहने ठेवण्याची व्यवस्था उड्डाणपुलावर करण्यात आली होती. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने दुचाकी वाहने पार्क करण्यात आली असतानाही पुलावरून वाहतूक मात्र सुरूच होती.

Web Title: Ganeshotsav 2022 Akola Ganesh Festival Idol Procession Road Traffic Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..