'कर्मा' चा पुढाकार; बाप्पाच्या मोदकातून केले बीजारोपण   

ganpati morya.jpg
ganpati morya.jpg

उदगीर (जि.लातूर) : वृक्षारोपनाला चालना देण्यासाठी पर्यावरण रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जाणिवेतून गणपती बाप्पाच्या आवडीच्या मोदकातून बीज रोपण उपक्रम हाती घेत पर्यावरण पुरक बनवलेल्या ३५१ नैसर्गिक मोदकांचे वनराईत बिजारोपण केले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
 
कर्मा फाऊंडेशन या सामाजीक संस्थेने गणेश चतुर्थीच्या सणामध्ये जनजागृतीसाठी  बिजारोपण संकल्प करुन पर्यावरणासाठी उपयुक्त मातीच्या मोदकात नीम, चिंच, करंजी, कडुलिंब, सीताफळाच्या बिया टाकुन बनवलेले ३५१ मोदक  उदगीर परिसरातील वनराईत, गौरक्षण, साई धाम, अवलकोंडा घाटात जमिनीमध्ये टाकले. तरी हे ई-मोदक तग धरून कालांतराने उगवतात त्यांची मोठी वृक्ष होतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोनाच्या काळात उत्सवाला मर्यादा आल्या असल्या तरी गणपती बाप्पालाच मोदक न वाहता या निसर्गालाही या गणेश चतुर्थीत मोदक वाहिले आहेत. या संस्थेने वृक्षारोपनातून दिलेला संदेश हरित उदगीर मोहीमेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

गणेश उत्सवाबरोबरच अन्य सार्वजनिक उपक्रम येतात. परंतु वृक्ष लागवडीसाठी या उत्सवातुन वेगळी संकल्पना घेवुन ध्येयवेड्या तरुणाचा हा उपक्रम पर्यावणासाठी  दिर्घकाळ फलदायी ठरणारा आहे. या उपक्रमात युवा उद्योजक हर्ष भुतडा, पृथ्वीराज नवटक्के, निखिल सूर्यवंशी, सोहम पेंन्सलवार, अनिकेत कांबळे, समर्थ पटवारी, उमेश भालेराव, रजत चटनाळे, संगमेश वाल्लूरे, गणेश रावी यांनी सहभाग घेतला.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com