जलसंवर्धन नौकेतून संदेश पाणी व्यवस्थापनाचा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

रत्नागिरी -  महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मुसळधार पाऊस पडतो. नदी, नाले, ओढ्यांमार्फत सर्व पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे अन्य ऋतूत पाणीटंचाई भासते. याच वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी समस्या सुटू शकते, असा संदेश पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारलेल्या देखाव्यातून दिला आहे. 

पालघरवाडी मंडळ हे दरवर्षी विविध सामाजिक संदेश देणारे अप्रतिम देखावे सादर करते. यंदाचे हे 47 वे वर्ष आहे. कोकणात यावर्षी पाऊसच पाऊस कोसळत आहे; पण त्याचे व्यवस्थापनच होत नसल्याने वाया जाते. तालुक्‍यातून वाहणाऱ्या भारजा नदीपात्रातून जलसंवर्धन नौका येते. नौकेवरील कोळी दाम्पत्य पाण्याचे जीवनातील महत्त्व विषद करताना पाणी अडवा, पाणी जिरवा सांगतात. वाहून जाणाऱ्या पाण्याचे शेततळे, जलयुक्त शिवार, गावागावात बंधारे, धरणे, त्यांची डागडुजी अशा माध्यमातून व्यवस्थापन करण्याचे आवाहन करतात. यानंतर गणरायाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना नौकेत घेऊन नौका मार्गस्थ होते.

नौकेतून प्रवास करताना सुमधुर कोकणी गाणी कानावर पडतात, तर डोळ्यांना आजूबाजूला नैसर्गिक सौदर्यांची लोभस रूपे पाहायला मिळतात. नौकेतून उतरल्यानंतर पायवाटेने चालत जावे लागते. पुढे गेल्यानंतर बांबू संवर्धनाचा संदेश देताना त्यापासून तयार करण्यात आलेल्या दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते. यात बांबूपासून बनविलेले झुंबर लक्ष वेधून घेते. याठिकाणी बाप्पाची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. 

कृष्णा नदी वाट करून देते 
बाळूमामा यांच्या जीवन प्रवासात एका कठीण प्रसंगी कृष्णा नदी दुभंगून वाट करून देते, त्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. त्यातूनही नद्यांचे महत्त्व सांगून निसर्गाशी मानवाचे असलेले नाते अधोरेखित केले आहे. या संपूर्ण देखाव्यासाठी मंडळाला विविध स्तरावर पुरस्कार, नागरिकांच्या कौतुकाची थाप मिळाली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water management message from water conservation boat Ganesh scene in Palgharwadi