सोनवडे येथे २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

शिवाजीराव चौगुले
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे.

सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची स्थापना सन १९९७ मध्ये झाली.  मंडळाने आतापर्यंत गणेशोत्सव कालावधीत स्वच्छता मोहीम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दारूबंदी, बालविवाह, निर्मलग्राम, या विषयांवर समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात मंडळाने भजन, कीर्तनाचे  आयोजन केले. 

आतापर्यंत कापड व कागदापासून अनेक इकोफ्रेंडली देखावे मंडळाने साकारले. प्रामुख्याने मोदक, गरूड, होडी, विमान, उंदीर, पर्णकुटी, छत्री, भुताचा वाडा यासारख्या कलाकृतीतून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonavade Shrikant Ganesh Madal Ganesh special story