गणेशोत्सव2019 : सेलिब्रिटींच्या ढोलताशाने आनंदोत्सवात भर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

गणेशोत्सव2019 : पुणे - गर्दीने खचाखच भरलेले रस्ते... पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... ढोलताशांचा गजर... सर्वत्र मंगलमय वातावरण अन्‌ त्यातच गणेशभक्तांना टीव्हीवर दिसणारे कलाकार ढोलताशा वाजवताना झालेल्या दर्शनाची पर्वणी मिळाल्याने आनंदोत्सवात आणखीनच भर पडली.

मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोलताशा पथक सहभागी झाले होते. पाच वर्षांपासून हे कलावंत गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहेत. यंदा कलावंत पथकाने मुंबईत सिद्धिविनायकाच्या विसर्जन मिरवणुकीतही सहभाग घेतला होता. 

यंदा पुण्यात मिरवणुकीसह कलावंतांना पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. अनेकजण कलावंतांचे फोटो काढण्यात; तर अनेकजण व्हिडिओ काढण्यात मग्न होते. या मिरवणुकीमध्ये अभिनेता सौरभ गोखले, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, अक्षय वाघमारे, तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, अनुजा साठे, शाश्‍वती पिंपळीकर, स्वप्नाली पाटील, शाल्मली टोलये, अभिज्ञा भावे यांनी तब्बल सहा तास ढोलताशा वादन केले. अमित रानडे व सुजय नातू यांनी व्यवस्थापन पाहिले; तर सिद्धेश्‍वर झाडबुके यांनी पथकात सहभागी होत सर्वांना फेटेही बांधले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Celebrity Dhol Tasha