आग्रोळीत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्‍याच मनोभावे जोपासली जात आहे. या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करतात.

नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्‍याच मनोभावे जोपासली जात आहे. या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करतात. २९ गावांतील हे असे गाव आहे, की ज्यांच्याकडून सलग ५९ वर्षांपासून हा एकोपा टिकवला जात आहे. 

लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव बेलापूरच्या आग्रोळी गावात पाहायला मिळत आहे. या गावात ’एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात असून, या उत्सवाचे यंदाचे ५९ वे वर्ष आहे. या गावात १५० कुटुंबे आहेत. दरडोई १५०० रुपये वार्षिक देणगी जमवली जाते. गणेशोत्सवादरम्यान ११ दिवस भजन, कीर्तन व मुलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रम राबवले जातात. कोणताही डामडोल न करता गावकीच्या लोकसहभागातून हा उत्सव साजरा केला जातो.

कॉर्पोरेट हब म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत सीबीडी-बेलापूरमधील पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गाव वसलेले आहे. एकेकाळी या गावाची उभ्या महाराष्ट्रात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा गड अशी ओळख होती. ठाणे-बेलापूर पट्ट्यात १९६१ मध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेग या भीषण रोगाने रौद्र रूप धारण केले होते. बेलापूर पट्ट्यात भातशेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशात हा आजार, यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे घरातील गणरायाची स्थापना कशी करायची, असा प्रश्न गावातील प्रत्येक कुटुंबाला पडला होता. यावर उपाय म्हणून पंचक्रोशीत मान असलेले गावातीलच कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांसमोर ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडली. सुरुवातीला ग्रामस्थांनी याबाबतची मनातील भीती कॉम्रेड पाटील यांना बोलून दाखवली. गणपतीची स्थापना न केल्यास देव कोपेल, अशा प्रकारची भीती समस्त ग्रामस्थांना होती. यावरही उपाय म्हणून कॉम्रेड पाटील यांनी स्वतःच्या घरातील मूर्तीपूजन बंद करून गावाच्या मंदिरात पूजन करत पुढाकार घेतला. परिणामी कॉम्रेड पाटील यांची भूमिका ग्रामस्थांना पटली. या परिवर्तनानंतर ग्रामस्थांनी जे ठरवले ते आजतागायत निरंतर सुरू आहे.

अडकलेले प्रकल्प मार्गी लागणार
नवी मुंबई महापालिका ही या उद्‌घाटनांच्या लगीनघाईत आपले अडकलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा विचार करीत आहे. महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेले तब्बल ८ प्रकल्प उद्‌घाटनांअभावी रखडले आहेत. यापैकी वाशी येथे पहिल्यांदाच परिवहन उपक्रमामार्फत तयार केल्या जाणाऱ्या वाणिज्य संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे विचाराधीन असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मोठे श्रम घेऊन वेळेत तयार केलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या माध्यमातून फडणवीस यांना आमंत्रण दिले आहे. परंतु त्यांच्या वेळेनुसार कार्यक्रमाचा दिवस निश्‍चित केला जाईल.
- संजय चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The concept of 'one village, one Ganpati' in Agroli