भाविकांनो, गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी पुण्यात 'हे' हौद वापरा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

- खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील विसर्जन हौद पाण्याखाली गेले आहेत.
- आज गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक विसर्जन घाटावर येणार आहेत. 
-  पुणेकरांनी भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल याया हौदाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

पुणे : खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील विसर्जन हौद पाण्याखाली गेले आहेत. आज गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक विसर्जन घाटावर येणार आहेत. तरी पुणेकरांनी भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या हौदाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

डेक्कन, शनिवार पेठ, टिळक पुल, आपटे घाट, पटवर्धन, अष्टभुजा, लकडी पुल, एस. एम जोशी, भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या ठिकाणी मध्यवर्ती पुण्यातील विसर्जन घाट आहेत. आज खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विर्सग सुरु असल्यामुळे यापैकी  डेक्कन, शनिवार पेठ, टिळक पुल, आपटे घाट, पटवर्धन, अष्टभुजा, लकडी पुल हे नदीपात्रातील हौद पाण्याखाली गेले आहेत तर, नदीपात्राबाहेर असलेले भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल येथील हौद विसर्जनासाठी उपलब्ध आहेत. 

पुणेकरांनी  भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या हौदांचा वापर करावा असे आवाहन महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This artificial tank for immersion is Available at pune in Ganesha Festival 2019